मायक्रोसॉफ्टने सुमारे ६० हजार पात्र कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा एक्झिट ऑफर
यात भारत, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील निवडक विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश
ही योजना सक्तीच्या कर्मचारी कपातीपेक्षा वेगळी
आता बातमी आहे मायक्रोसॉफ्टच्या निर्णयाची. टेक जगतातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यासाठी अनोखा पॅटर्न राबवलाय. कंपनीच्या या पॅटर्नमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मायक्रोसॉफ्टचा अनोखा पॅटर्न नेमका काय आहे? कंपनीनं किती कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय?.. पाहूयात या रिपोर्टमधून.
एआयमुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीची सत्र सुरू आहे. कंपन्यांकडून एआय खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नोकर कपातीचा निर्णय घेतला जातोय. अशातच आता टेक जगतातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टनं जगभरातील सुमारे 60 हजार कर्मचाऱ्यांना 'व्हॉलिंटरी एक्झिट पर्याया'च्या नावाखाली नोकरकपात सुरू केलीय. विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट कंपनीची या वर्षातली ही दुसरी नोकरकपात आहे. मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला 'व्हॉलिंटरी एक्झिट पर्याय' नेमका काय आहे ते पाहूया.
मायक्रोसॉफ्टकडून 60 हजार कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक नोकरी सोडण्याची ऑफर
भारत, अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांसाठी पर्याय
AI, कोपायलट, वित्त आणि मानव संसाधन (HR) विभागांचे कर्मचारी पात्र
डेटा सेंटर, सेल्स आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांना ठेवले बाहेर
मायक्रोसॉफ्टच्या सुमारे 27% कर्मचारी नवीन बायआउट ऑफरसाठी पात्र
मायक्रोसॉफ्टनं कंपनीमध्ये लवचिकता आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पुढील पर्याय निवडण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, जुलै महिन्यात कंपनीनं तब्बल 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील वाढता खर्च आणि व्यवसायात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटलं होतं.
आता पुन्हा एकदा AIच्या स्पर्धेत कंपन्या आता मनुष्यबळापेक्षा AI प्रणालींना प्राधान्य देत असल्याचं यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एकीकडे, कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यासाठी विशेष पॅकेज दिली जात असली, तरी दुसरीकडे AIच्या युगात प्रत्येक आयटी कर्मचाऱ्यांसमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान उभं राहिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.