Mexico Plan Crashes Saam TV
देश विदेश

Mexico Plan Crashes: मेक्सिकोमध्ये मोठी दुर्घटना; नागरिकांची गर्दी असलेल्या कार्यक्रमात विमान कोसळलं, पायलटचा जागीच मृत्यू

Video Viral: जेंडर रिव्लीलच्या अशाच एका कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

Mexico News:

मेक्सिकोमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एका समारंभादरम्यान फुले उधळणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यूही झालाय. (Latest Marathi News)

मेक्सिकोमध्ये जेंडर रिव्हील हा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरु असताना होणाऱ्या बाळाचे आई बाबा फार आनंदी होते. त्यांच्या आनंदात सहभागी होत शुभेच्छा देण्यासाठी भरपूर पाहुणे देखील येथे उपस्थित होते. मुलगी होणार की मुलगा हे जाहीर केल्यावर समारंभात पती पत्नीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी एका विमानातून देखील त्यांच्यावर गुलाल आणि फुले उधळण्यात आली. या विमानाचा भीषण अपघात झाला आहे.

गुलाल आणि फुले उधळून विमान पुढे गेल्यावर काही तांत्रिक बिघाड या विमानात झाला. त्यामुळे विमान खाली कोसळलं. या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडली तेव्हा पायलटला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सदर घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. आनंदाच्या कार्यक्रमात दु:खद घटना घडल्याने कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर दु:ख व्यक्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT