Nagpur Crime News : कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ

Crime News : नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे.
arrests
arrestssaam tv

Nagpur News :

मात्र नागपुरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सासू-सुनेचे वाद हे अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट आहे. मात्र नागपूरमध्ये सुनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केली आहे. ताराबाई शिखरवार असे हत्या झालेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. तर पूनम आनंद शिखरवार असे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेचे नाव आहे. (Latest News Update)

arrests
Bhiwandi Accident News: भिवंडीत २ मजली इमारत कोसळली, २ चिमुकल्यांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

या प्रकरणााची माहिती मिळताना प्रतापनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी सुनेला अटक केली. सासू ताराबाई आणि सून पूनम यांच्यात कौटुंबिक कारणाने नेहमी वाद व्हायचे. यातूनच संतापलेल्या सुनेने ताराबाई यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ताराबाई यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com