मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला इशारा, त्या दिवशी तुम्ही पराभूत व्हाल...  Saam TV
देश विदेश

मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारला इशारा, त्या दिवशी तुम्ही पराभूत व्हाल...

काश्मीरी नागरिक कमकुवत नाहीत. ते खुप संयमी आणि धाडसी आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था

''जम्मू-काश्मीरमधील (Jammu-kashmir) लोकांचे धैर्य समाप्त होईल, त्या दिवशी तुम्ही पराभूत व्हाल,'' अशा शब्दांत जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)यांनी मोदी सरकारला (Modi Government) इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये (Kulgam) त्या बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा-

'शेजारच्या अफगाणिस्तानकडे बघा, अफगाणिस्तानात महाशक्ती असलेल्या अमेरिकेला सैन्यासह सर्व साहित्यासह गुंडाळून अफगाणिस्तानातून माघारी जावे लागले. पण काश्मीरी नागरिक कमकुवत नाहीत. ते खुप संयमी आणि धाडसी आहेत. मात्र त्यांच्या संयमाचा अंत होईल, त्यादिवशी तुम्हाला पराभव स्विकारावा लागेल, असे म्हणत मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान यापुर्वी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात त्यांच्या आई गुलशन नजीर यांची ईडीनं तीन तास चौकशी केली होती. यावरही त्यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला होता.

ईडीने माझ्या आईवर आरोप करुन वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी बोलावले आहे. राजकीय विरोधकांना धमकावण्याच्या प्रयत्नात, भारत सरकार ज्येष्ठ नागरिकांनाही सोडत नाही. NIA (National Investigation Agency) आणि ED सारख्या एजन्सी आता बदला घेण्याचे साधन बनल्या आहेत. असेही त्यांनी म्हटले होते.

तसेच, मी फेररचना आयोगाला भेटण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला समन्स बजावण्यात आल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला. तसेच, ५ ऑगस्ट २०२१ रोजी शांततामय आंदोलन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा समन्स बजावल्याचे यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. तसेच, अती गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी एनआयए, ईडी या संस्थांची निर्मिती झाली आहे. पण दुर्दैवानं राजकारणी, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या विरोधात याचा वापार केला जात असल्याचा आरोपही यावेळी मुफ्ती यांनी केला.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Datta Jayanti Puja Vidhi: श्री दत्त जंयत्ती पूजा कशी करावी? कोणत्या मंत्राचा जप करावा?

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT