अकोल्यातील हिवरखेड गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव; गावकऱ्यांचा आरोप

हिवरखेड नगरपंचायत रोखण्यासाठी काही जण सक्रिय झाले असून हिवरखेड नगरपंचायत करण्यात येऊ नये आणि हिवरखेड गावाचे दोन तुकडे करून गावात दोन ग्रामपंचायती व्हाव्यात असे प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अकोल्यातील हिवरखेड गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव; गावकऱ्यांचा आरोप
अकोल्यातील हिवरखेड गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव; गावकऱ्यांचा आरोपजयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील हिवरखेड नगरपंचायतसाठी हिवरखेड वासियांचा मागील 22 वर्षाचा संघर्ष शासन दरबारी फळास येत असल्याचे पाहून व आमरण उपोषणाची दखल घेऊन हजारो हिवरखेड वासीयांनी साखळी उपोषण केले आणि सह्या देऊन आपले लेखी समर्थन दर्शविले. सोबतच आमदार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवरखेड नगरपंचायत करणारच असे सांगताच हिवरखेड नगरपंचायत रोखण्यासाठी काही जण सक्रिय झाले असून हिवरखेड नगरपंचायत करण्यात येऊ नये आणि हिवरखेड गावाचे दोन तुकडे करून गावात दोन ग्रामपंचायती करण्यात याव्या असा ठराव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे देखील पहा -

या ग्रामसभेत लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. उपस्थित नागरिकांच्या सह्या घेण्यापूर्वीच विषयाचे वाचन करण्यात आले. विषय वाचन झाल्यावर कोणत्याही विषयावर साधक-बाधक चर्चा आणि मतदान न करताच सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे यांनी व इतर नागरिकांनी विचारणा केली असता काही असामाजिक तत्वांनी आवाज उचलणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य सुनिल इंगळे व सर्वसामान्य नागरिकांवर धावून जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करून तणाव निर्माण केला.

तसेच ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, यांनी ग्रामसभेच्या कामकाजाचे रजिस्टर घेऊन ग्रामसभेतून काढता पाय घेतला. ज्या व्यक्तीस आपण सही मारलेल्या अर्जात संबंधितांनी काय लिहून घेतलेले आहे हे सुद्धा माहीत नाही, असे बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात आल्याने त्या अर्जदारास समोर करून गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव जनतेसमोर उघडा पडल्याची गावभर चर्चा आहे.

अकोल्यातील हिवरखेड गावाचे दोन तुकडे करण्याचा कुटील डाव; गावकऱ्यांचा आरोप
'बैलगाडा शर्यत' दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणार : दिलीप वळसे-पाटील

या ग्रामसभेच्या माध्यमातून हिवरखेड नगरपंचायत होऊ न देणे तसेच हिवरखेड गावाचे दोन तुकडे करून दोन ग्रामपंचायती कराव्या असा अर्ज देणाऱ्या अर्जदाराची पाठराखण करून हिवरखेड नगर पंचायत निर्मितीची स्थानिक स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना तसेच नगरपंचायत करण्यासाठी ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे ठराव सुद्धा गेलेले असल्याची माहिती अर्जदाराला देण्याऐवजी गावाचे दोन तुकडे करून दोन ग्रामपंचायतची करण्याचा ठराव घेण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांचे पितळ जनतेसमोर उघडे पडल्याची चर्चा गावभर होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com