Meerut Saurabh Rajput Murder Case Saam Tv News
देश विदेश

Saurabh Rajput Case : मुस्कान झुठी है! मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थंड डोक्याने रचला प्लान; पण एका चुकीने खेळ खल्लास

Saurabh Rajput Case update : सौरभच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्ही आरोपींनी थंड डोक्याने प्लान रचला होता. मात्र, पोलिसांना पुरावे हाती लागलेच.

Vishal Gangurde

मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. सौरभ राजपूतची निर्घृण हत्या करणारे मुस्कान आणि साहिल पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या चौकशीत सौरभची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींनी धक्कादायक खुलासा केला आहे.

सौरभच्या मृतदेहाची ओळख होऊ नये, यासाठी शीर धडापासून वेगळं केल्याचा खुलासा आरोपींनी केला आहे. तसेच, बोटांचे ठसे ओळखू येऊ नये, यासाठी मनगट कापल्याचा खुलासा आरोपींनी केला. आरोपींनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर पोलीसही हैराण झाले.आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने सौरभला संपवल्याचं समोर येत आहे.

सौरभ हत्याकांडात पोलिसांनी अनेक पुरावे सापडले आहेत. फॉरेन्सिक टीमला चादर आणि उशीवर हत्येचे पुरावे सापडले. बाथरुमच्या टाईल्स आणि नळावर रक्त आढळलं. सौरभ आणि मुस्कानच्या खोलीत एक सुटकेस होती. त्याच सुटकेसमध्ये मृतदेह टाकण्याचा दोघांनी प्रयत्न केला. मात्र, दोघांना जमलं नाही. त्यानंतर दोघांनी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून एका ड्रममध्ये भरले.

मेरठच्या घरात सौरभची हत्या केली. खोलीतील बेडवर सौरभची हत्या केली. त्यानंतर बाथरुममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये टाकले. फॉरेन्सिकच्या पथकाने घरातील सर्व पुरावे जमा केले. त्यानंतर पुढील तपासासाठी एफएसएल लॅबमध्ये पाठवले. सौरभच्या हत्येचे पुराव्यात मिक्सरचा जार, बेडवरील चादर, बाथरुममधील रक्ताचे नमुने, मुस्कानची हँडबॅग, कपडे आणि कागदपत्रांचा समावेश आहे.

दरम्यान, मुस्कान आणि साहिलने सौरभची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं. सौरभला बेशुद्ध केल्यानंतर त्याच्यावर वार केले. दोघांनी मिळून सौरभचे १५ तुकडे केले. दोघांनी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी मिक्सरच्या जारचा देखील वापर केल्याचे समोर आलं आहे. मिक्सरच्या जारवरून दोघांनी सौरभची क्रूर हत्या केल्याचे समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT