Saurabh Murder Case : लोंबकळणारी त्वचा, हलणारे दात, हृदयापर्यंत वार; सौरभचं पोस्टमॉर्टेम करताना डॉक्टरांचाही थरकाप

Meerut Saurabh Murder Postmartem Report : सौरभ राजपूतचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. सौरभसोबत झालेला प्रकार अतिशय भयंकर आहे. चाकूचे तीन वार त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्याच्या हृदयाला गंभीर इजा झाली.
Meerut Saurabh Kumar murder case
Meerut Saurabh Kumar murder caseSaam Tv News
Published On

लखनऊ : मर्चंट नेव्हीचा माजी कर्मचारी सौरभ राजपूतच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण देश हादरला. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठला आलेल्या सौरभची हत्या त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने केली. हत्येनंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. ते एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून तो ड्रम सिमेंटनं भरुन टाकण्यात आला. त्यानंतर ड्रम घरातच लपवण्यात आला. सौरभचा मृतदेह, त्याची छिन्नविच्छिन्न अवस्था पाहून डॉक्टरांच्या अंगावर देखील शहारे आले.

सौरभ राजपूतचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. सौरभसोबत झालेला प्रकार अतिशय भयंकर आहे. चाकूचे तीन वार त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले. त्यामुळे त्याच्या हृदयाला गंभीर इजा झाली. मी आजपर्यंत कधीही अशा प्रकारचा मृतदेह पाहिलेला नाही, अशा प्रकारच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलेलं नाही, अशा शब्दांत डॉक्टर अशोक कटारिया यांनी मृतदेहाच्या स्थितीची माहिती दिली.

Meerut Saurabh Kumar murder case
Shocking Incident : लव्ह मॅरेज केलं, बायको तडक माहेरी गेली; नवऱ्याची सटकली; भररस्त्यातून फिल्मी स्टाइलनं अपहरण, VIDEO

सौरभची हत्या २ आठवड्यांपूर्वी झाल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं आहे. त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. मृतदेहाची त्वचा लोंबकळत होती आणि सगळे दात हलत होते. मी माझ्या ३० वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत अशी केस पाहिली नव्हती, असं डॉ. कटारिया म्हणाले. मेरठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदनगृहात दरवर्षी १५०० ते १८०० मृतदेहांचे शवविच्छेदन होतं. यातील ७०० ते ८०० शवविच्छेदनांमध्ये मी स्वत: लक्ष घालतो. शवविच्छेदन प्रक्रियेत सहभागी होतो. पण सौरभसारखी केस मी आजवर पाहिलेली नाही. त्याच्या मृतदेहाची स्थिती भयंकर होती, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Meerut Saurabh Kumar murder case
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी? DCM एकनाथ शिंदेंकडून मोठी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com