Meerut Crime News Saam Tv
देश विदेश

Meerut Crime News: मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला निर्वस्त्र करुन पळवले, व्हिडिओ व्हायरल होताच...

Uttar Pradesh Police : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

Priya More

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये मणिपूरसारखी (Manipur Case) धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला निर्वस्त्र करुन रस्त्यावरून पळवले. मेरठच्या किठोर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या किठोर गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उसाच्या शेतामध्ये नेले. त्याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीचे मित्र त्याठिकाणी आले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले.

आरोपींनी यावेळी पीडितेला मारहाण देखील केली. पीडित मुलीला कधी बेल्टने तर कधी काठीने मारहाण केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करत उसाच्या शेतातून पळवत रस्त्यावर आणले. ही घटना होऊन तीन महिने झाले. आरोपींनी रविवारी पीडित मुलीच्या बहिणीच्या मोबाईलवर हा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर तिच्या बहिणीने पीडितेला घटनेविषयी विचारपूस केली. तेव्हा घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली.

याप्रकरणी पीडित मुलीने कुटुंबीयांसोबत किठोर पोलीस ठण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जाहिद आणि त्याचे मित्र जावेद आणि आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद करणारे दोन आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT