Delhi Plane Fire: दिल्ली विमानतळावर ‘स्पाइसजेट’ विमानानं घेतला पेट; कर्मचाऱ्यांची पळापळ, थरकाप उडवणारा VIDEO

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी (25 जुलै) स्पाइसजेटच्या विमानाला अचानक आग लागली.
Delhi Plane Fire
Delhi Plane FireSaam Tv
Published On

Delhi News: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी (25 जुलै) स्पाइसजेटच्या विमानाला अचानक आग लागली. सायंकाळी 7.55 च्या सुमारास अधिकाऱ्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विमानतळावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने आग विझवली. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण केलं. (Latest Marathi News)

Delhi Plane Fire
Farmers News: बळीराजाच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित; तक्रारींचे तात्काळ निवारण होणार

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, की मंगळवारी (25 जुलै) दिल्ली (Delhi) विमानतळावर पार्क केलेल्या स्पाइसजेटच्या (Spicejet) विमानाला अचानक आग लागली. या घटनेत विमान आणि देखभाल करणारे कर्मचारी सुरक्षित असल्याचे स्पाइसजेटने म्हटले आहे.

या घटनेबाबत स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, रात्री 8 वाजता फायर अलार्म सिस्टमद्वारे Q400 विमान देखभालीसाठी ग्राउंड असताना इंजिनला आग लागल्याचा कॉल आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन उपकरणाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. खबरदारी म्हणून अग्निशमन (Fire Brigade) दलालाही पाचारण करण्यात आले. या अपघातात विमान आणि देखभाल करणारे कर्मचारी सुरक्षित असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com