Assam Crime News: लॉकडाऊन लव्हस्टोरी आणि तिहेरी हत्याकांड अशी एक अंगावर काटा आणणारं तिहेरी हत्याकांड समोर आलं आहे. लॉकडाऊन काळात फेसबुकवर तिच्याशी मैत्री, मग प्रेम, नंतर लग्न आणि अखेर तिहेरी हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे. (Latest Marathi News)
एक तरुणाने आपल्याच बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलं आहे. यावरही तो न थांबता त्याने आपल्या सासू आणि सासऱ्यांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सगळं करून त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
२५ वर्षीय नाझीबूर रहमान बोरा हा पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर आहे. २०२० साली संपूर्ण देशात लॉकडॉऊन लावण्यात आला होता. तेव्हा फेसबुकवर नाझीबूर आणि संघमित्रा यांची ओळख झाली. दोघे, तासनतास चॅट करायचे, या ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी भेटायचं ठरवलं.
नाझीबूर आणि संघमित्रा कोलकात्यात भेटले. दोघे काही दिवस एकत्रही राहिले. पण संघमित्राच्या आई वडिलांचा या नात्याला विरोध होता. त्यांनी संघमित्राला परत घरी आणलं, पण त्या आधीच संघमित्रा आणि नाझीबूरचं लग्न झालेलं होतं.
संघमित्रा जेव्हा घरी आली होती, तेव्हा एक नवीनच संकट उभं राहिलं. संघमित्राच्या आई वडिलांनी आपल्या मुलीच्या विरोधात चोरीची तक्रार केली. या प्रकरणी संघमित्राला पोलिसांनी अटक केली होती. आणि संघमित्राने एक महिन्यांसाठी तुरुंगाची हवाही खाल्ली.
जानेवारी २०२२ मध्ये संघमित्रा आणि नाझीबूर यांची पुन्हा भेट झाली. या वेळी दोघे चेन्नईत भेटले. चेन्नईत दोघे पाच महिने राहिले. त्यानंतर दोघे आसाममधे गेले. तेव्हा संघमित्रा गरोदर होती. नोव्हेंबर महिन्यात संघमित्राने एका सुदृढ बाळाला जन्म दिला. सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण अवघ्या चार महिन्यातच संघमित्रा बाळाला घेऊन परत आपल्या माहेरी आली.
नाझीबूर आपला छळ करतो असं संघमित्राने सांगितलं. इतकंच नाही तर तिने नाझीबूरची पोलिसांत तक्रारही केली. पोलिसांनी नाझीबूरला अटकही केली. २८ दिवस तुरुगांत राहिल्यानंतर नाझीबुर बाहेर आला. नाझीबूर बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या मुलाला भेटण्यासाठी प्रयत्न केला. पण संघमित्रा आणि कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. संघमित्राच्या भावाने नाझीबूर विरोधात पोलिसांत तक्रार केली.
नाझीबूरने आपल्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचे संघमित्राच्या भावाने सांगितले. सोमवार २४ जुलै नाझीबूर आणि संघमित्रामध्ये पुन्हा भांडणं झाली. यावेळी नाझीबूरच्या डोक्यात राग गेला. त्याने किचनमधून चाकू घेतला आणि संघमित्राच्या पोटात खुपसला. घरात संघमित्राचे आई वडिलसुद्धा होते. नाझीबुरने त्यांनाही भोसकलं. बाळाला घेतलं आणि तिथून पसार झाला.
त्यानंतर नाझीबुरच्या साक्षात्कार झाला. झालेली चूक लक्षात आली, त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी जेव्हा संघमित्राच्या घरी धाव घेतली, तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तीन मृतदेह आढळले. सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. फेसबुकवरून सुरु झालेल्या या लव्हस्टोरीचा असा करूण अंत झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.