Martyr Captain Anshuman Singh Wife Saam Tv
देश विदेश

Martyr Captain Anshuman Singh Wife: सासरच्या आरोपांवर पहिल्यांदाच शहीद अंशुमनच्या पत्नीने दिलं उत्तर, काय आहे प्रकरण?

Martyr Captain Anshuman Singh Family Controversy: शहीद अंशुमनच्या आई-वडिलांच्या आरोपांना पहिल्यांदाच सून स्मृतीने उत्तर दिलंय. स्मृतीने अंशुमनच्या पालकांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केलेत.

Rohini Gudaghe

नवी दिल्ली: शहीद अंशुमनच्या आई-वडिलांच्या आरोपांवर पहिल्यांदाच अंशुमनची पत्नी स्मृती यांनी उत्तर दिलंय. स्मृती यांनी अंशुमनच्या पालकांच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सियाचीनमध्ये शहीद झालेले कॅप्टन अंशुमन यांना नुकतंच मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलंय. शहीद अंशुमन यांच्या पत्नी स्मृती सिंह यांना हा सन्मान मिळाला होता.

सासरच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?

मात्र, काही दिवसांनी शहीद अंशुमनच्या पालकांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे अंशुमनच्या आईने वापरलेले एटीएमही स्मृतींनी ब्लॉक केल्याचा आरोप देखील करण्यात आला (Martyr Captain Anshuman Singh Family Controversy) होता. आता यावर शहीद अंशिमन यांच्या पत्नी स्मृती यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.

शहीद अंशुमनच्या पालकांचे सूनेवर धक्कादायक आरोप

शहीद अंशुमनच्या पालकांनी सूनेवर केलेले आरोप खूपच धक्कादायक होते. यावर आता स्मृती सिंह यांनी प्रथमच उत्तर दिलंय. हिंदी वृत्तवाहिनीच्या हवाल्यानुसार, स्मृती सिंह यांनी सासू आणि सासऱ्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्या म्हणाल्या की, माझा कोणताही आक्षेप नाही. ज्यांची जशी विचारसरणी असेल, तसेच ते बोलतील.

स्मृती यांनी अंशुमनच्या पालकांचा व्हिडिओ मागवला (Anshuman Singh Family Wife Smriti) आहे. त्या म्हणाला की सध्या मी बाहेर आहे. त्यामुळे मला याबाबत फारशी माहिती नाही. मी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तर देईन, असं त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे स्मृती व्यवसायाने अभियंता आहेत, त्यांचे पालक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. स्मृतीच्या वडिलांनी देखील या आरोपांवर कोणतेही उत्तर देण्यास नकार दिलाय.

शहीद अंशुमन सिंह कीर्तीचक्राने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५ जुलै रोजी शहीद अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह यांना कीर्तीचक्राने सन्मानित केलं होतं. काही दिवसांनंतर अंशुमनच्या पालकांनी आरोप केला होता की, त्यांची सून कीर्तीचक्र घेऊन माहेरी निघून गेली (Martyr Captain Anshuman Singh) होती. एटीएम ब्लॉक करून पोस्टपेड सिम प्रीपेड मिळवण्याचा सर्वात धक्कादायक आरोप देखील त्यांनी केला होता. अंशुमनच्या आईने सांगितलं होतं की, ती एटीएम वापरत होती. तर, प्रीपेड सिम अंशुमनच्या नावावर होते, ते अंशुमनचे वडिल वापरत होते. मात्र, सुनेने घरच्यांना त्यातून दूर केल्याचा आरोप अंशुमनच्या आईने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT