Tejas Mankar Martyr : गोळीबारात २२ वर्षीय तरुण जवान शहीद; निरोप देताना हजारोंची गर्दी, साऱ्यांचा कंठ दाटला

आज तेजस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे.
Tejas Mankar Martyr : गोळीबारात २२ वर्षीय तरुण जवान शहीद; निरोप देताना हजारोंची गर्दी, साऱ्यांचा कंठ दाटला
Published On

Satara News : पंजाबच्या बठिंडामध्ये सैन्य तळावर 12 एप्रिलला झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील करंदोशी गावातील तेजस मानकर या २२ वर्षीय जवानाच्या डोक्यात गोळी लागली होती. या दुर्घटनेनंतर त्यांना मिलिट्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तेजस यांना वाचवण्यासाठी डॉक्टकांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र डॉक्टरांना यात अपयश आले. आज तेजस यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. (Marathi News)

अवघ्या 22 वर्षांचा जवानाला वीरमरण आले आहे. आज हजारो लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात तेजस यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तेजस यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या गावी आणण्यात आले. यावेळी लोकांनी ठिकठिकाणी तेजस मानकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

Tejas Mankar Martyr : गोळीबारात २२ वर्षीय तरुण जवान शहीद; निरोप देताना हजारोंची गर्दी, साऱ्यांचा कंठ दाटला
Sad News:भारतीय उद्योग जगतावर शोककळा,शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार,बजाज समूहाचे कर्मचारी शोकाकूल,पाहा व्हिडीओ

ठिकठिकाणी शहीद जवान तेजस मानकर अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. पार्थिव घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर पोलिस विभागाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून जवान तेजस मानकर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांचा मोठा भाऊ मेजर ओंकार मानकर याने तेजस यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदाय आणि नेते मंडळी उपस्थितीत होते. वीरमरण आलेल्या तेजस मानकर यांच्या वडिलांनी बठिंडा येथे झालेल्या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.

तेजस यांचे प्राथमिक शिक्षण (Education) गावी झाले होते. अत्यंत हुशार, हजरजबाबी व मनमिळाउ स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे. वडिल सेवेवर रुजू असताना त्यांनी विविध ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केले. वडील व भावाप्रमाणे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, तसेच देशसेवेसाठी तेजस गेल्या दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते.

Tejas Mankar Martyr : गोळीबारात २२ वर्षीय तरुण जवान शहीद; निरोप देताना हजारोंची गर्दी, साऱ्यांचा कंठ दाटला
Women Fighting In Bus Viral Video : लोकल ट्रेननंतर आता बसमध्ये महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com