विवाहित पुरुषाने गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये शरीरसंबंध ठेवले, त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
मृत्यूनंतर कोर्टाने गर्लफ्रेंडवर कारवाई करत पीडिताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
ही धक्कादायक घटना दक्षिण चीनमधील हॉटेलमध्ये घडली असून तिची जोरदार चर्चा सुरु आहे.
Shocking Incident : एका विवाहित व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये बोलावले होते. शारीरिक संबंधांनंतर व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कोर्टाने गर्लफ्रेंडवर कारवाई केली आहे. गर्लफ्रेंडला त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुमारे सात लाख रुपयांहून अधिक पैसे भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. हॉटेल रुममध्ये शारीरिक संबंधांनंतर ६६ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. ही घटना दक्षिण चीनमधील एका हॉटेलमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६६ वर्षीय झाऊ हा त्याची गर्लफ्रेंड झुआंगसोबत दक्षिण चीनमधल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. शारीरिक संबंधांनंतर काही तासांनी झाऊचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. झाऊची पत्नी आणि मुलाने हॉटेल व्यवस्थापन आणि झुआंग यांच्यावर आरोप केला आहे. झाऊला वाचवण्यात अपयश आल्याचा आरोप करत त्यांनी कोर्टात खटला दाखल केला होता.
झाऊ आणि झुआंग हे १९८० च्या दशकात एका कारखान्यात सहकारी होते. २०२३ मध्ये एका पार्टीत ते पुन्हा भेटले. त्यानंतर त्यांच्या अफेयरची सुरुवात झाली. एका हॉटेलमध्ये दोघांनी चेक इन केले. शारीरिक संबंधनांनंतर दोघे झोपी गेले. जेव्हा झुआंग जागी झाली, तेव्हा शेजारी झोपलेला झाऊ श्वास घेत नसल्याचे झुआंगच्या लक्षात आले.
झुआंगला रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे ती तिची औषधे घेण्यासाठी हॉटेलवरुन घरी गेली होती. हॉटेलमध्ये परतल्यावर खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने झुआंगने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली. खोलीत प्रवेश केल्यावर कर्मचाऱ्यांना झाऊ बेशुद्ध अवस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली. पुढे डॉक्टरांनी झाऊचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.