Explainer  Saam Digital
देश विदेश

Explainer : रशियाच्या तुरुंगांमध्ये कोणते बडे नेते भोगतायेत शिक्षा? अलेक्सी नवाल्नी यांच्या गुढ मृत्यूनंतर का होतेय पुतीन यांच्यावर टीका? जाणून घ्या

Alexey Navalny Death: जग काही डझनभर राजकर्त्यांच्या हातातील खेळणं बनत चाललं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यापैकीच एक. पुतिन यांना टीकाकार आवडत नाहीत अशी जगभारातून त्यांच्यावर टीका होत असते.

Sandeep Gawade

Vladimir Putin

जग काही डझनभर राजकर्त्यांच्या हातातील खेळणं बनत चाललं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यापैकीच एक. पुतिन यांना टीकाकार आवडत नाहीत अशी जगभारातून त्यांच्यावर टीका होत असते. पुतिन यांचे असेच एक विरोधक आणि टीकाकार - अलेक्सी अलेक्सी नवाल्नी यांना गेल्या काही वर्षात जगात मोठं नाव मिळालं, पण काल त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि जगात खळबळ उडाली. 19 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या नवलनीचा तुरुंगात रक्त गोठल्यामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

इटली, स्वीडनपासून ते झेक प्रजासत्ताक, नाटो, अमेरिकेने व्लादिमीर पुतिन यांना नवलनीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. दरम्यान पुतीन यांच्याविरोधात बोलल्यामुळे नवलनी यांच्यासारखे अनेक नेते सध्या रशियातील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत आहे. अलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इल्या यशिन

युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर इल्या याशिन यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. ते नवलनी यांचे दीर्घकाळ सहकारी राहीले आहेत. यशिन यांना डिसेंबर २०२२ मध्ये साडेआठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. यूट्यूबवरील थेट प्रक्षेपणात यशिन यांनी रशियन सैन्याने केलेल्या युद्धगुन्ह्यांचा तपास करण्याची मागणी केली आणि पुतीन यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यामुळे रशियन सैन्याबद्दल जाणीवपूर्वीक खोटी माहिती पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्लादिमीर कारा-मुर्जा

व्लादिमीर कारा-मुर्जा विरोधी नेता आणि विरोधी पक्ष नेते बोरिस नेमत्सोव्ह यांचे माजी सहाय्यक आहेत ज्यांची 2015 मध्ये मध्य मॉस्कोमध्ये हत्या झाली होती. देशद्रोह आणि इतर आरोपांवरून एप्रिल 2023 मध्ये त्यांना 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. व्लादिमीर कारा-मुर्जा यांना गेल्या महिन्यात नवीन सायबेरियन पीनल कॉलनीत ठेवण्यात आलं आहे. कारा-मुर्जा देखील दोनदा गूढ विषाचा बळी ठरले आहेत. ज्यामुळे तो 2015 मध्ये आणि पुन्हा 2017 मध्ये कोमात गेले होते. सध्या ते मज्जातंतूच्या विकाराने त्रस्त आहेत.

इगोर गिरकिन

इगोर गिरकिन एक प्रमुख राष्ट्रवादी माजी मिलिशिया कमांडर आहेत. त्यांना ‘स्ट्रेलकोव्ह’ किंवा ‘शूटर’ म्हणून ओळखलं जातं. गिरकिन क्रेमलिनचा मोठा समर्थक होता, पण काही वर्षांतच ते पुतीन यांचे सर्वात मोठे टीकाकार बनले. 2014 मध्ये, जेव्हा पूर्व युक्रेनमध्ये लढाई सुरू झाली तेव्हा त्याने त्याचे समर्थन केले. 2022 मध्ये, 2014 मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे फ्लाइट MH17 युक्रेनवर पाडल्याबद्दल डच न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तीन लोकांपैकी ते एक होते. गेल्या महिन्यात पुतिनचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 53 वर्षीय गिरकिन यांनी मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतिन यांच्या विरोधात लढण्याची जाहीर घोषणा केली होती.

चनीशेवा, ओस्टानिन आणि फदेवा

चनीशेवा, ओस्टानिन आणि फदेवा, ही तिन्ही नावं अलेक्सी नवलनी यांच्याशी संबंधित आहेत. ज्याची त्यांना किंमत मोजावी लागली आहे. हे तिघंही नवलनी यांच्या राजकीय मोहिमेचे आणि त्यांची भ्रष्टाचारविरोधी संस्था - अँटी करप्शन फाउंडेशन (FBK) चे माजी कर्मचारी आहेत. "एक अतिरेकी संघटना तयार केल्याबद्दल" चनीशेवा यांना जूनमध्ये साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बर्नौल या सायबेरियन शहरात नवलनीचे स्थानिक मुख्यालय हाताळण्याची जबाबदारी ओस्टानिनकडे होती. जुलैमध्ये त्यांना अतिरेकी समुदायामध्ये मध्ये भाग घेतल्याबद्दल नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सायबेरियाच्या टॉमस्क प्रदेशातील एफबीकेचे माजी प्रमुख फदेयेवा यांना डिसेंबरमध्ये "अतिरेकी संघटना" चालवल्याबद्दल साडेनऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नवलनीच्या वकिलांनीही किंमत मोजावी लागली किंमत

नवलनी यांच्याच्या तीन वकिलांना ऑक्टोबरमध्ये अतिरेकी गटाशीसंबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. वकिलांवर आरोप आहे की त्यांनी तुरुंगात असलेल्या नवलनीपर्यंत पोहोचण्याचा उपयोग अतिरेकी कारवाया करण्यासाठी केला. नवलनी यांनी हे दावे हास्यास्पद असल्याचं म्हणत फेटाळून लावले. रशियाच्या गृहमंत्रालयाने या महिन्यात आपल्या वॉन्टेड यादीत नवलनीच्या आणखी दोन वकिलांचा समावेश केला आहे. ओल्गा मिखाइलोवा आणि अलेक्झांडर फेडुलोव्ह अशी त्यांची नावे आहेत. हे दोघंही सध्या रशियाबाहेर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT