Breaking News: लोकसभेपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? अशोक चव्हाणांनंतर बडा नेता भाजपच्या संपर्कात!

Congress Vs BJP: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. कमलनाथ यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत आणि ते दिल्लीकडे निघाले आहेत. कमलनाथ यांच्यासह त्यांचे चिरंजीव नकुलनाथ देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
Breaking News
Breaking NewsSaam TV
Published On

kamalnath News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का मिळाण्याची शक्यता आहे. नुकतेच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. चव्हाणांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असतानाच आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.

Breaking News
Mumbai Crime News: जन्मदात्या आईनेच केली पोटच्या ११ वर्षीय मुलीची हत्या; मुंबईतील बोरिवली परिसरातील घटना

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. कमलनाथ यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत आणि ते दिल्लीकडे निघाले आहेत. कमलनाथ यांच्यासह त्यांचे चिरंजीव नकुलनाथ देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे कमलनाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र काँग्रेसकडून हा दावा फेटाळला जात आहे. कमलनाथ यांचे पुत्र आणि छिंदवाडा येथील काँग्रेस खासदार नकुल नाथ यांनी त्यांच्या एक्स प्रोफाइलमधून काँग्रेसचा लोगो हटवला आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. नकुल नाथ यांच्यासह काँग्रेसचे अन्य १० आमदार देखील भाजपमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान या सर्व चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, "कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या ही केवळ मीडियाची ब्रेकिंग न्यूज आहे. कमलनाथ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गांधी घराण्यापासून केली आहे. ते काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नेते आहेत."

Breaking News
Mumbai Crime News: जन्मदात्या आईनेच केली पोटच्या ११ वर्षीय मुलीची हत्या; मुंबईतील बोरिवली परिसरातील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com