Rakesh Tikait Saam Tv
देश विदेश

राकेश टिकैतांच्या किसान संघटनेत उभी फुट; नव्या संघटनेची स्थापना

राकेश टिकैत यांच्याविरोधात उघड बंड, राजेश चौहान यांच्या नेतृत्वाखाली नव्या संघटनेची स्थापना.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : दिल्लीत वर्षभर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु ठेवलेल्या शेतकरी संघटनेत उभी फुट पडली आहे. राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्या भारतीय किसान संघटनेत फुट पडली आहे. टिकैत यांच्या भारतीय किसान संघटनेतील अनेक मोठे नेते बाहेर पडले आहेत. या नेत्यांनी वेगळ्या अराजयकीय किसान संघटनेची स्थापना केली आहे. ही नवी संघटना भारतीय किसान युनियन (अराजकीय) या बॅनरखाली काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांची पुण्यतिथीदिवशीच संघटनेत उभी फुट पडली आहे.

यूपी, एमपी आणि उत्तराखंडच्या नाराज शेतकरी (Farmers) नेत्यांनी बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राजेश सिंह चौहान यांना भारतीय किसान युनियनचे (अराजकीय) अध्यक्ष करण्यात आले आहे. टिकैत यांच्यापासून वेगळे होत काही नेत्यांनी 'भारतीय शेतकरी (Farmers) संघटनेची (अराजकीय)' स्थापना केली आहे.

अराजकीय नावाने नवी संघटना

राजेश सिंह चौहान, राजेंद्र सिंह मलिक, अनिल तालन, हरनाम सिंग वर्मा, बिंदू कुमार, कुंवर परमार सिंग, नितीन सिरोही यांच्यासह सर्व नेते नव्या संघटनेत सामील झाले आहेत. भारतीय किसान युनियनने अराजकीय नावाने नवी संघटना स्थापन केली आहे. राजेश सिंह चौहान यांची भारतीय किसान युनियन अराजनैतिकच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या काळात राकेश टिकैत यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे संघटनेत दोन फूट पडल्याची चर्चा आहे. भारतीय किसान युनियनचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ही संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल. या नव्या संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल तालन यांनी 'किसान तुम बढे चलो'चा नारा त्यांनी दिला.

दिल्लीत शेतकऱ्यांनी (Farmers) मोठं आंदोलन केलं होतं तेव्हा राजेंद्र सिंह मुजफ्परनगरमध्ये भाजपच्या जवळ होते. त्यांनाच आता संघटनेत निमंत्रक आणि मार्गदर्शक बनवण्यात आले असून ते गाठवालाचे प्रमुख आहेत.

राकेश टिकैत यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. टिकैत यांनी फुटीला सरकारला जबाबदार धरले. 'या सगळ्यामागे सरकार आहे आणि त्यांनीच सर्व काही केले आहे. २६, २७ आणि २८ जानेवारी २०२१ रोजी ज्या प्रकारे लोकांनी शरणागती पत्करली होती, त्याच पद्धतीने आज १५ मे रोजीही काही लोकांनी सरकारपुढे शरणागती पत्करली आहे, असंही टिकैत म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT