'५५ वर्ष हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण...' : सुप्रिया सुळे

Supriya Sule on Ketaki Chitale : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केतकीचा निषेध नोंदवल्यानं सुप्रिया सुळेंनी आभार मानले.
NCP MP supriya sule reaction on ketaki chitale case
NCP MP supriya sule reaction on ketaki chitale case Saam Tv

पुणे : कोणाच्याही वडिलांनी मरावं असं बोलणं कोणत्या संस्कृतीत बसतं. सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणं ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे. या घटनेचा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निषेध नोंदवला. त्या सर्वांचे जाहीर आभार. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील. ५५ वर्षे हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण कोणाला असं उत्तर दिलं नाही. ही आमची संस्कृती, मला त्याचा अभिमान आहे', अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ( NCP MP Supriya Sule on Ketaki Chitale )

हे देखील पाहा -

खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे या केतकी चितळे प्रकरणावर बोलत होत्या. 'काही लोकांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर काहीतरी लिहिलं आहे. ते कुठल्याच कायद्यात बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. या प्रकरणी न्यायालय त्याच काम करेल', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे सुप्रिया सुळे यांना केतकी चितळेवर झालेल्या हल्ला आणि शाईफेकीवर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, 'राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचं सर्मथन नाही. कोणाच्याही वडिलांनी मरावं असं बोलण कोणत्या संस्कृतीत बसतं ?, खरं तर हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे', असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

NCP MP supriya sule reaction on ketaki chitale case
केतकीने पोस्टमध्ये 'तुका म्हणे' शब्द वापरल्याने देहू संस्थान आक्रमक, कारवाईची मागणी

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'या घटनेचा निषेध नोंदवणारे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जाहीर आभार. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील. अमोल मिटकरी यांना देखील नोटीस आली आहे. देशात एक यंत्रणा आहे. पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहेत. त्यामुळं मी भान ठेवून वागते. माध्यमाचा गैर वापर करणं हास्यास्पद आहे. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतींचे संस्कार आहेत. ५५ वर्षे हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण कोणाला असं उत्तर दिलं नाही. ही आमची संस्कृती मला त्याचा अभिमान आहे'.

दरम्यान, मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह कविता शेअर केल्यामुळं राजकरण चांगलंच तापलं आहे. सदर पोस्टमुळं केतकीला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं. त्यानंतर आज केतकीला कोर्टात हजर केलं. यावेळी केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com