केतकीने पोस्टमध्ये 'तुका म्हणे' शब्द वापरल्याने देहू संस्थान आक्रमक, कारवाईची मागणी

देहू संस्थानाने पत्र देत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
Ketaki Chitale
Ketaki ChitaleSaam TV

पुणे: केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत आणखी वाढ होण्याच्या शक्यता आहे. देहू संस्थानने केतकीने पोष्ट केलेल्या लिखाणात 'तुका म्हणे' हा शब्द वापरण्यात आला असून ती संत तुकारामांची नाम मुद्रा आहे, अभंगाची स्वाक्षरी मानली जाते अशा प्रकारे देशभरातील कोणत्याही संतांच्या नावाचा चुकीचा वापर करून वादग्रस्त पोष्ट केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी देहूरोड पोलीस ठाण्यात देहू संस्थांच्या वतीने पत्र दिलं आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. ठाणे पोलिसांनी काल केतकी चितळेला अटक केली होती. आज ठाणे न्यायलयासमोर तिला हजर केले असता न्यायालयाने तिला १८ तारेखपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

देहू संस्थानाने दिलेले पत्र
देहू संस्थानाने दिलेले पत्रदिलीप कांबळे

दरम्यान केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकी चितळेवरती गुन्हा दाखल झाला आहे. पुणे, अमरावती, ठाणे याठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. शरद पवारांवरती टीका करणे केतकी चितळेला चांगलेच भोवले आहे. केतकीला आज न्यायालयात हजर केले असता केतकीने आपण केलेली पोस्ट डिलीट करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर एखाद्या विरोधात बोलण्याचे आणि लिहिण्याचे मला स्वातंत्र्य आहे असेही ती म्हणाली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com