Assam Rifles convoy in Manipur  Saam tv
देश विदेश

Manipur Attack : भारताच्या लष्करावर भीषण हल्ला; तुफान गोळीबारात २ जवान शहीद, परिसरात खळबळ

Attack on Assam Rifles convoy in Manipur 2025 : मणिपुरात भारताच्या लष्कारावर हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.

Vishal Gangurde

मणिपूरच्या नांबोल भागात आसाम रायफल्स जवानांवर गोळीबार

या हल्ल्यात दोन जवान शहीद

हल्ला एका शस्त्रधारी गटाने वाहनांवर केला तुफान गोळीबार

हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आलीये, तर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

भारतातील मणिपूरच्या आसाम रायफल्सवर भीषण हल्ला झाला आहे. शस्त्रधारकांनी आसाम रायफल्समधील जवानांवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात ५ जवान जखमी झाले आहेत. तर दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता जवानांवर गोळीबार झाला. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर घटनेत एकूण २ जवान शहीद झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रधारकांच्या एका गटाने वाहनांवर गोळीबार केला. या वाहनातून आसाम रायफल्सचे जवान इंफाळ येथून बिष्णूपूर जिल्ह्यात जात होते. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले.

दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं की, 'जखमी जवानांना पोलीस आणि स्थानिक लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हल्लेखोरांचाही शोध सुरु करण्यात आला आहे.

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन वीरेन सिंह यांनीही या घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एन वीरेन सिंह यांनी म्हटलं की, '३३ असम रायफल्सच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप धक्का बसलाय. दोन जवान शहीद झाले. तर काही जवान जखमी झालेत. मी शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी जवान लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. शहीद जवानांचं धैर्य आणि बलिदान हृदयात जपुयात. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toothpaste Scam Alert : तुम्ही बनावट टूथपेस्ट तर वापरत नाही? कारण आले समोर, वाचा नेमकं प्रकरण काय आहे

हार्ड डिस्क अन् सेलफोनचा गैरवापर; चित्रपट निर्मात्याच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; पगार १ लाख २० हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Airtel Recharge Offer: एअरटेलचा स्वस्तात मस्त प्लॅन, एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस अन् अनेक फायदे

Heart Attack Signs: हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे झोपेतच जाणवतात, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिल्ला सल्ला

SCROLL FOR NEXT