Election Commission : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Election Commission News : देशातील नोंदणीकृत नसलेल्या निवडणूक आयोगाची मोठी कारवाई केली आहे. ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
Election Commission india
Election Commission Saam tv
Published On
Summary

निवडणूक आयोगाने ४७४ नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

सलग ६ वर्ष निवडणुकीपासून दूर राहिल्यामुळे आणि आर्थिक लेखाजोखा न सादर केल्यामुळे ही कारवाई

आतापर्यंत ८०८ पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आलीये

महाराष्ट्रातील ४४, उत्तर प्रदेशातील १२१ आणि पंजाबमधील २१ पक्षांचा समावेश

निवडणूक आयोगाने देशातील बिगर मान्यप्राप्त राजकीय पक्षांवर मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाकडून ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याआधी ऑगस्ट महिन्यात मोठी कारवाई केली होती. आयोगाने एकूण ३३४ पक्षांची नोंदणी रद्द केली होती. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणुकीत सहभाग नोंदवू शकतो. सलग ६ वर्ष निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या राजकीय पक्षांचं नोंदणी रद्द होते. या नियमाअंतर्गत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आयोगाने आतापर्यंत ८०८ पक्षांची नोंदणी रद्द केली आहे.

Election Commission india
Self Help Allowance : बेरोजगारांना महिन्याला मिळणार १००० रुपये; निवडणुकीच्या तोंडावर नितीश सरकारची मोठी घोषणा

नोंदणीकृत राजकीय पक्षांना करात देखील सूट मिळते. परंतु ६ वर्ष निवडणुकीत सहभाग न नोंदवणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई करण्यात येते. २०१९ सालापासून आयोगाकडून नोंदणीकृत नसणाऱ्या राजकीय पक्षांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून या वर्षी ९ ऑगस्ट रोजी पहिली कारवाई करण्यात आली. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी दुसरी कारवाई करण्यात आली आहे. आयागोकडून मागील दोन महिन्यात ८०८ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

Election Commission india
Pune Police : गुन्हेगारांनो मान बाहेर काढाल तर...; निलेश घायवळ टोळीतील गुंडांच्या गोळीबारानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

आता पुन्हा ३५९ राजकीय पक्ष आयोगाच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. यातील काही राजकीय पक्ष मागील ६ वर्षांपासून निवडणुकीपासून लांब आहेत. तसेच या राजकीय पक्षांनी मागील तीन वर्षांत फायनान्शिअल ऑडिटची माहिती दिली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Election Commission india
Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

आयोगाकडून कारवाई करण्यात आलेले राजकीय पक्ष हे २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशातील १२१ राजकीय पक्ष होते. तर बिहार १५, हरियाणा १७, मध्य प्रदेशमधील २३ राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील ४४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर पंजाबच्या २१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com