Thane Shocking : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; स्टोअर मॅनेजरचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
ठाण्यात ७व्या मजल्यावरून पडून ४९ वर्षीय स्टोअर मॅनेजरचा मृत्यू
सचिन गुंडेकर सिद्धी ग्रुपमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून कार्यरत
अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने घटनास्थळी धाव
कापूरबावडी पोलीस पुढील तपास करतेय
ठाणे : ठाण्यातील बाळकुममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचं काम सुरु असताना सातव्या मजल्यावरून कंपनीच्या स्टोअर मॅनेजरचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यतील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ठाण्यातील बाळकुममध्ये इमारतीचे काम सुरू असताना सातव्या मजल्यावरून पडून ४९ वर्षीय सचिन गुंडेकर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ते सिद्धी ग्रुप इंटरप्राईजेस या कंपनीत स्टोअर मॅनेजर म्हणून काम करत होते.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कापूरबावडी हद्दीत ३२ मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून ४९ वर्षीय सचिन वसंत गुंडेकर यांचा पडून मृत्यू झाला. इमारतीच्या ७ व्या मजल्यारून कोसळल्यानंतर तळमजल्यावर असलेल्या लोखंडी पार आणि दोरखंडामध्ये अडकले होते.
सचिन गुंडेकर इमारतीतून पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी वेताळ यांच्यासोबत कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी हे १ पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे जवान १ इमर्जन्सी वाहन, १ रुग्णवाहिकासह पोहोचले होते.
अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीवरून पडलेल्या सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. तर सचिन गुंडेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सचिन गुंडेकर यांचा मृतदेह बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठवला. तर कापूरबावडी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.