Singhu border: मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी चौघांना अटक
Singhu border: मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी चौघांना अटक Saam Tv
देश विदेश

Singhu border: मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी चौघांना अटक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी सिंघु बॉर्डरवर एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह देखील लटकवण्यात आला होता. या घटनेमुळे देशात मोठी खळबळ माजली होती. दरम्यान, याप्रकरणी आता चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळले आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी २ निहंगांना अटक करण्यात आली आहे, तर इतर २ आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

हे देखील पहा-

आत्मसमर्पण करण्याअगोदर दोघांनी डेरामध्ये श्रीगुरु ग्रंथ साहिबसमोर अरदास अर्पण केली आहे. शनिवारी संध्याकाळी, सोनीपत पोलिसांचे एक पथक आत्मसमर्पण केलेल्या निहंगांना घेण्याकरिता रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सिंघू सीमेवर असलेल्या निहंगांच्या तंबूत पोहोचले आणि सुमारे ४५ मिनिटांनी दोघांनाही त्याठिकाणी अटक करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी झालेल्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण ४ निहंग पोलिसांच्या ताब्यात आहेत. सरबजीत सिंगने शुक्रवारी आत्मसमर्पण केले होते तर, शनिवारी नारायण सिंगने अमृतसरमध्ये शरणागती पत्करली होती. भगवंत सिंग, गोविंद सिंग यांनी सिंगू सीमेवर कुंडली पोलिसांना आत्मसमर्पण केले आहे.

दरम्यान, शनिवारी पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यामधील गावात कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान मृत लखबीर सिंगवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. लखबीरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अर्दाससाठी त्याठिकाणी कोणताही ग्रंथी उपस्थित नव्हता, किंवा त्याच्या गावी चीमा कलांमधील कोणीही अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! फी न भरल्याने हजारो विद्यार्थ्यांचा निकाल रखडला; पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार

पंढरपूर : नीरेच्या पाण्यासाठी 9 गावांतील शेतकरी आक्रमक, भाजपला दिला थेट इशारा

Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

Today's Marathi News Live : अखेर काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर

SCROLL FOR NEXT