Yavatmal: पान शेतीतून शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक समृद्धी...

यवतमाळ कमी क्षेत्रात इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न देणारी म्हणून पानशेतीला प्रतिष्ठा आहे.
Yavatmal: पान शेतीतून शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक समृद्धी...
Yavatmal: पान शेतीतून शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक समृद्धी...संजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ कमी क्षेत्रात इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न देणारी म्हणून पानशेतीला प्रतिष्ठा आहे. उमरखेड तालुक्यातील विडूळ हे गाव पानशेती अर्थात पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहे. पानशेतीमुळे विदर्भात विडूळ गावाला स्वतंत्र ओळख देखील मिळाली. पानशेतीतून शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक समृद्धी नांदत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. पारंपरिक शेतीला बगल देत पानशेती केल्यास शेतकर्‍यांची आर्थिक भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.

राज्यात ठाणे, सातारा, पुणे, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ हे पानाच्या लागवडीचे प्रमुख जिल्हे मानले जातात. विड्याचे पान पिकविणारे विडूळकर, असे विश्लेषण गावाला लागले होते. पानशेती ही निश्‍चितच शेतकर्‍यांना इतर शेती पिकाच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन आणि उत्पन्न देणारी शेती आहे. इतर पिकांच्या तुलनेत पानशेतीने आर्थिक बळ दिल्याचे हे शेतकरी सांगत आहेत.

हे देखील पहा-

साधारणत: १० ते १५ गुंठे क्षेत्रफळाच्या पानमळ्यावर ४ ते ५ कुटुंबे उपजीविका चालवू शकतात. म्हणजेच एकरी १० ते १५ कुटुंबाला आर्थिक आधार देणारी नगदीची ही शेती आहे. अर्धा एकर पानशेतीतून वर्षाला अडीच ते ३ लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते. पानमळ्यात शेतकरी रासायनिक खताचा कमी प्रमाणात वापर करतात. मशागत इतर पिकांसारखीच केली जाते. सुरुवातीला शेवगा लागवड केली जाते. त्याचे वेल वाढत असल्याने पान बांधण्यासाठी त्याचा फायदा होतो. आकडा आणि फापडा अशा पानांचे उत्पन्न शेतकरी घेत असतात.

मनपाड आणि नागपूरला फापडा पान विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. शिवाय उमरखेड या ठिकाणी बुधवार आणि शनिवारी बाजार भरतो. शेतकरी मोठ्या प्रमाणात पानांची विक्री करतात. विडूळपासून माहूरदेवस्थान जवळच आहे. त्याठिकाणी दररोज एक लाख पान लागतात. मात्र, कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने पानशेती करणार्‍यांना चांगलाच फटका बसला आहे. विडूळ गावात २५ ते ३० शेतकरी पानशेती लागवड करतात. दीड एकर शेती असून, ३ मळे आहेत. अर्धा एकरात मागील वर्षी आणि अर्धा एकरात ऑगस्ट महिन्यात पानांची लागवड करण्यात आली होती.

Yavatmal: पान शेतीतून शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक समृद्धी...
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भरवस्तीत महावितरणच्या रोहित्राचा स्फोट...

मशागत इतर पिकांसारखीच केली जाते. रासायनिक खताचा वापर केला जात नाही. अर्धा एकरात वार्षिक उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये मिळते. पानविक्रीसाठी उमरखेड येथेही बाजारपेठ उपलब्ध आहे. आकडा आणि फापडा पानाला चांगली मागणी आहे. मनमाड आणि नागपूर येथे विक्री केली जाते. कोरोनामुळे मंदिर बंद आहेत. त्याचाही फटका आम्हाला बसला आहे. पंधरा वर्षापासून पानमळ्यात काम करत आहेत.

१० गुंठ्यात चांगले उत्पन्न मिळते. ४ महिने पानाचे सिझन असते. हिवाळा आणि उन्हाळ्यात कमी प्रमाणात पान निघत असतात. त्याठिकाणी विक्री केली जाते. याशिवाय यवतमाळ, पुसद, हतगाव, नांदेड येथील व्यापारी पान खरेदीसाठी विडूळला येतात. वडिल, आजोबा, पनजोबा पानशेती करत होते. दर महिन्याला ८ ते १० हजार रुपये उरत असतात. दुसर्‍या कामापेक्षा पानशेतीत जास्त मोबदला मिळत आहे. पान खराब होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जाते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com