mamata banerjee Saam tv
देश विदेश

सत्ता गेली आता पक्ष अन् चिन्ह जाणार? पश्चिम बंगालमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'

West Bengal Politics: टीएमसी आमदारांमधील नाराजीच्या वृत्तांमुळे संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘महाराष्ट्र पॅटर्न’च्या चर्चेमुळे ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Bharat Jadhav

  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा सुरू आहे.

  • ५० ते ६० आमदार बंडाच्या भूमिकेत असल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

  • महाराष्ट्रातील शिवसेना फुटीप्रमाणे ‘महाराष्ट्र पॅटर्न’ बंगालमध्ये लागू होण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ता गेलेल्या टीएमसीमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. पक्षातील आमदार नाराज असल्याने पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांची चिंता वाढली आहे. याचाच फायदा घेत पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षातील तब्बल ५० ते ६० आमदार बंडाच्या भूमिकेत असून ते नवा पक्ष तयार करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये असंतोष पसरला असून काही नेते बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी नवी शिवसेना निर्माण केली त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सुरूंग लावत नवी पक्ष असली तृणमूल पक्ष तयार केला जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

ऋतब्रत बॅनर्जी बनतील पश्चिम बंगालचे 'एकनाथ शिंदे'?

टीएमसीने ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा यांना निलंबित केले. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की, हकालपट्टी झालेल्या या दोन आमदारांपैकी एक असलेले ऋतब्रत बॅनर्जी हे टीएमसीचे नवे शिंदे बनू शकतात. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह एक वेगळा पक्ष स्थापन केला, त्याचप्रमाणे ऋतब्रत बॅनर्जीसुद्धा एक नवीन पक्ष स्थापन करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतब्रत बॅनर्जी असाच प्रयोग करत नवीन पक्ष तयार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे ऋतब्रत बॅनर्जी यांनी संदीपान साहा यांच्यासोबत पक्षाच्या सभांना उपस्थित राहणे थांबवले आहे.

'असली तृणमूल' नावाचा नवा पक्ष बनणार

राज्यातील राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये अनेक आमदार नाराज आहेत. नाराज आणि निलंबनाची कारवाई ज्या आमदारांवर झाली आहे, त्यांनी एकमोट बांधली असून त्यांचे बैठक सत्र सुरू आहे. कोलकाता येथील आमदार निवासात या आमदारांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये टीएमसी पक्षाचे भविष्य,संघटनात्मक बदल आणि संभाव्य नवीन राजकीय पर्यायावर चर्चा झालीय.

सुमारे १५ ते २० टीएमसी आमदार पक्षाच्या नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. हे नाराज नेते 'रिअल तृणमूल' नावाचा एक वेगळा राजकीय मंच स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनाही या राजकीय धक्क्याची चाहूल लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIP असो की सरकारी अधिकारी, महामार्गावर टोल लागणार; सरकार बदलणार नियम

वजन कमी करण्यासाठी भन्नाट उपाय! फक्त रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' १ काम, काही दिवसांतच दिसेल फरक

LPG च्या नियमात पुन्हा बदल; आता ग्राहकांना आणखी पैसे मोजावे लागणार

Beed : बीडमध्ये धक्कादायक प्रकार! कराडच्या गुंडांकडून महिलेला अमानुष मारहाण, प्रायव्हेट पार्टवर बेल्टने हल्ला

Maharashtra News Live Update: धाराशिव-बीड-लातूर विधान परिषदेसाठी सर्वांचे सर्व 14 अर्ज वैध

SCROLL FOR NEXT