Mohammad Muizzu Twitter
देश विदेश

Mohammad Muizzu: भारताने १५ मार्च आधी मालदीवमधून सैन्य हटवावे; चीनमधून परतताच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू पुन्हा बरळले

Mohammad Muizzu News: मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पुन्हा एकदा भारताविरुद्ध बरळले आहेत. चीनमधून परतताच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने १५ मार्च आधी मालदीवमधून सैन्य हटवावे, असं वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

Mohammad Muizzu Latest News:

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पुन्हा एकदा भारताविरुद्ध बरळले आहेत. चीनमधून परतताच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने १५ मार्च आधी मालदीवमधून सैन्य हटवावे, असं वक्तव्य केलं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षांपासून मालदीवमध्ये भारतीय सैन्याची तुकडी तैनात आहेत. मालदीवच्या मागील सरकारने आग्रह केल्याने भारतानं आपलं सैन्य मालदीवमध्ये रवाना केलं होतं. समुद्री तटांची सुरक्षा आणि आपात्कालीन मदतीसाठी भारताचे सैन्य तैनात केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तत्पूर्वी, मुइज्जू हे शनिवारी चीनच्या दौऱ्यावरून परतून मालदीवमध्ये आले. चीनमधून परतताच मुइज्जू यांनी भारताला डिवचले आहे. 'आमचा देश आकाराने लहान असेल, पण आमच्यावर दादागिरी करण्याचा कोणाचाही अधिकार नाही, असं मुइज्जू म्हणाले. मुइज्जू यांनी भारताचं नाव न घेता हे वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांचा रोख भारताकडे असल्याचं बोललं जात आहे.

भारत- मालदीवमध्ये तणाव का निर्माण झाला?

भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणाव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशात तणाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली होती. पीएम नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टिप्पणी केल्याने मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुर झाला होता. मालदीव आणि भारताचा तणाव वाढू लागल्याने मालदीव सरकार अडचणीत आल्याचं बोललं जात आहे.

मालदीवला बसला हजारो कोटींचा फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरील फोटोवर मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. मालदीव सरकारच्या टिप्पणीनंतर भारतात. बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला होता. मालदीवचा महसूल केवळ पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो.

त्यात वादामुळे भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये न जाण्याचं आव्हान केलं जात आहे. भारत आणि मालदीव वादामुळे दिवसाला अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं बोललं जात आहे. भारत आणि मालदीव वादामुळे मालदीवनेच आपली ४४ हजार कुटुंबे अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : कांद्याने बळीराजाला रडवलं! प्रति किलो विकला फक्त १ रुपयात, चहा-पाण्यालाही पैसे उरले नाहीत

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT