Reliance Group Ambani: अंबानी 'या' देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी घेणार विकत

Jio Platforsm Enter In Sri Lanka : रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या शेजारील देशाची सरकारी टेलिकॉम कंपनी विकत घेणार आहे. आता अंबांनींचा बोलबाला परदेशातही होणार आहे.
Reliance Group
Reliance Group Saam Tv
Published On

Reliance Group In Sri Lanka Telecom Sector Government Company

भारतातील दूरसंचार क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा जिओ आता भारताबाहेर व्यवसाय करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Group) भारताच्या शेजारील देशाच्या दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्यास स्वारस्य दाखवलं आहे. तिथली सरकारी कंपनी विकत घेण्याची ते तयारी करत आहे. (latest marathi news)

भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Group) टेलिकॉम कंपनी जिओचं वर्चस्व कायम आहे. मोबाईल नेटवर्क विभागापासून ते फायबर मार्केटमध्येही ते वेगाने आपला व्यवसाय विस्तारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 जून 2023 पर्यंत, रिलायन्स जिओचा भारतातील फिक्स्ड-लाइन टेलिकॉम ऑपरेटर्सचा मार्केट शेअरमध्ये 32.83 टक्के हिस्सा होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

;x

बाजारपेठेत जिओचा सर्वाधिक हिस्सा

2023 च्या आर्थिक वर्षात वायरलेस ग्राहकांच्या बाजारपेठेत जिओचा (Reliance Group Jio) सर्वाधिक हिस्सा 36 टक्क्यांपेक्षा जास्त होता. भारतात आपला व्यवसाय वाढवणारी ही कंपनी आता भारताबाहेरही दूरसंचार क्षेत्रात स्वतःची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी जिओ (Jio) प्लॅटफॉर्मने सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी श्रीलंका टेलिकॉम पीएलसीमध्ये हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असलेले श्रीलंका सरकार निधी उभारण्यासाठी अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचा विचार करत आहे. कोलंबोने 10 नोव्हेंबरपासून संभाव्य गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवले होते. 12 जानेवारीची अंतिम मुदत संपल्यानंतर, श्रीलंका सरकारने एक प्रेस नोट जारी केली, जिओ प्लॅटफॉर्म्स (Reliance Group), गॉरट्यून इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड आणि पेटीगो कॉमर्सिओ इंटरनॅशनल एलडीए यांना तीन संभाव्य बोलीदार म्हणून नावे दिली. संपूर्ण तपशील लवकरच उघड होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Reliance Group
Mukesh Ambani Praises PM Modi: मोदी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान : मुकेश अंबानी

जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन

जिओ (Reliance Group) श्रीलंकेतील टेलिकॉमसह शेजारील देशाच्या बाजारपेठेत सामरिक पाऊल ठेवत आहे. ब्रोकरेज कंपनी BofA ने Jio प्लॅटफॉर्मचे मूल्य $107 अब्ज असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. BofA ने एका नोटमध्ये म्हटले आहे की, Jio Platforms यावर्षी त्याच्या प्रगत फीचर फोन JioBharat आणि वायरलेस ब्रॉडबँड डिव्हाईस JioAirFiber द्वारे बाजारपेठेत अधिक सखोल प्रवेश करेल. तसंच नवीन ग्राहक जोडत राहतील अशी अपेक्षा करते.

Reliance Group
HOW Keep Your Child Away Mobile Phones: मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी वापरा 'या'ट्रिक्स्

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com