Maldives President Saam Tv
देश विदेश

Maldive: मालदीवच्या आडमुठेपणामुळे १४ वर्षांच्या मुलाचा उपचाराविना मृत्यू; नेमकं काय झालं?

Maldives News: मालदीवमधील एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताने प्रदान केलेले विमान एअरलिफ्टसाठी वापरण्याची परवानगी न दिल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India Maldives Crisis

काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमध्ये तणाव सुरू आहे. याचा परिणाम मालदीवमधील सर्वसामान्य जनतेवर होताना (India Maldives Crisis) दिसतोय. आता भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एका 14 वर्षाच्या मुलाचा जीव गमवावा लागलाय. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या हट्टीपणामुळे या मुलाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार मालदीवमध्ये (India) एका 14 वर्षीय मुलाचा कथितरित्या मृत्यू झालाय. कारण राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी त्याला भारताने एअरलिफ्टसाठी दिलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी दिली नाही. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे उत्पादित आणि भारताने प्रदान केलेल्या डॉर्नियर विमानांचा बेट राष्ट्रात मानवतावादी हेतूंसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलाला काय झालं होतं

हा १४ वर्षांचा मुलगा ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोकने त्रस्त होता. त्यामुळे किशोरचे कुटुंब त्याला विल्मिंग्टनच्या दुर्गम बेटावरील गाफ अलिफ विलिंगिली येथून मालदीवची राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स शोधत (India Maldives Crisis) होते. तिथे त्याला चांगले उपचार मिळणार होते, असं अहवालात म्हटलंय. बुधवारी रात्री मुलाला पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राजधानीला एअरलिफ्टसाठी विनंती केली. मुलाला विमानाने माले हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कुटुंबीयांनी अनेक वेळा परवानगी मागितली, अनेक फोन कॉल्स केले, पण प्रतिसाद मिळाला नाही.

त्याच्या वडिलांनी मालदीवच्या माध्यमांना या संपूर्ण घटनेची माहिती दिलीय. आम्ही स्ट्रोकनंतर लगेचच आयलंड एव्हिएशनला फोन केला, पण उत्तर मिळालं नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता फोन आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विनंतीनंतर 16 तासांनी मुलाला मालेकडे नेण्यात आलं होतं. यादरम्यान, इमर्जन्सी इव्हॅक्युएशन रिक्वेस्ट मिळालेल्या आसंधा कंपनी लिमिटेडने विमानात तांत्रिक समस्या असल्याचं सांगितले आहे.

भारत आणि मालदीव तणावपूर्ण राजनैतिक संबंध

मुलाचा मृत्यू झालेल्या रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने होत असल्याची माहिती मिळतेय. मालदीवचे खासदार मिकेल नसीम यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलंय की, लोकांनी राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या वैराचे समाधान करण्यासाठी आपल्या जीवाची किंमत चुकवू नये.

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर (India Maldives Crisis) ही घटना समोर आली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक तणाव वाढला आहे, विशेषत: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. नवीन राष्ट्रपतींनी परराष्ट्र धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. नवे राष्ट्राध्याक्ष चीनकडे अधिक झुकताना दिसत आहेत. त्यामुळे मालदीव आता 'इंडिया फर्स्ट' या दृष्टिकोनातून मागे होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT