modi cabinet expansion  Saam tv
देश विदेश

मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्र्यांना खासदार झाल्यावर कोणते खाते मिळणार?

modi cabinet expansion : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना खासदार झाल्यावर कोणतं खाते मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार

नितीश कुमार यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता

देशाच्या राजकारणात उलटफेर होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत राज्यसभेवर आता नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहित नितीन नबीन, विनोद तावडे यांनाही मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मोदी सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता राज्यसभेवर जाणार आहेत. 20 वर्ष बिहारचं मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या नितीश कुमार यांनी अचानक राज्यसभेवर जाण्याची इच्छा दर्शवली. ते ३७ वर्षांनंतर जुन्या मार्गावर परतले आहेत. केंद्रात मोदी सरकार हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या खासदारांच्या समर्थनावर टिकून आहे.

नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रिपद सोडलं. त्यानुसार मोदी सरकारचा देखील मोठा प्लान असण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती पदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा झाली होती. परंतु ते तयार नव्हते. त्यामुळे भाजपने सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली.

नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना केंद्रात वजनदार खाते मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्कूल ऑफ पॉलिटिकल राइट्स अँड रिसर्चचे अध्यक्ष सुनील कुमार सिन्हा यांनी म्हटलं की, 'ते मुख्यमंत्रि‍पदाची खुर्ची सोडण्यास तयार झाले. ही बाब आश्चर्यकारक आहे. त्यांना उपपंतप्रधान करण्यात आल्यास आश्चर्यकारक वाटू नये. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भुषवलं. त्यांना मोदी सरकारमध्ये वरिष्ठ मंत्र्यासारखं वजनदार खाते मिळण्याची शक्यता आहे'. नितीश कुमार यांना नेमकं कोणतं पद मिळेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT