bjp News Saam tv
देश विदेश

Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

BJP Politics : पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी भाजपच्या महिला नेत्याला ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

चंडीगडमध्ये भाजप महिला मोर्चाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयइंदर कौर पोलिसांच्या ताब्यात

आंदोलनकर्त्यांकडून केजरीवाल आणि मुख्यमंत्री मान यांच्या निवासस्थानावर घेराव घालण्याचा प्रयत्न

चंडीगडच्या भाजप नेत्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून पंजाब महिला मोर्चाच्या अध्यक्षा जयइंदर कौर यांच्यासहित अनेक महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या आंदोलनकर्त्यांनी पंजाबमधील भाजप महिला मोर्चाने आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या चंडीगडमधील निवासस्थानावरही घेराव घालण्याचा योजना आखली होती. भाजपचे कार्यकर्ते आम आदमी पक्षाच्या सरकारने महिलांना १००० रुपये प्रति महिना हप्ता देण्याच्या आश्वासनाविरोधात रस्त्यावर उतरले. यावेळी पंजाबच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थाबाहेरही आंदोलने करण्याचा प्रयत्न केला.

चंडीगड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्र्‍यांच्या निवासस्थानापासून २०० मीटर दूर रोखलं. यामुळे आंदोलकर्त्यांनी बॅरिकेड देखील तोडण्याचा प्रयत्न केला. काही महिला आंदोलनकर्ते बॅरिकेडवर चढले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी भाजपच्या जयइंदर कौर यांच्यासहित आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या कारवाईने महिला आंदोलनकर्त्या देखील भडकल्या. आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिसांच्या बसला देखील घेराव घातला. पोलिसांनी पुढे येत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना हटवलं. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

जयइंदर कौर यांनी म्हटलं की, 'आम आदमी पक्षाने सरकार स्थापन झाल्यावर महिलांना प्रत्येक महिन्याला ११०० रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकारने आश्वासन पूर्ण केलं नाही पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पुढील वर्षी २०२६ सालच्या बजेटमध्ये ही योजना लागू करणार आहेत'.

पंजाबचे आपचे प्रवक्ते बलतेज पन्नू यांनी भाजपच्या मोर्चावर टीका करत म्हटलं की, 'जयइंदर कौर यांनी आधी स्वत:चे वडील अमरिंदर कौर यांना प्रश्न करावेत. २०१७ साली त्यांनी प्रत्येक घरातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यांनी सरकार स्थापन केल्यावर किती जणांना नोकऱ्या दिल्या? शेतकरी आणि कमिशन एजंटचे कर्ज माफ करणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली होती. बेरोजगोरांना नोकऱ्या देणे, ४ महिन्यात पंजाबला ड्रग्जमुक्त करणार होते, त्यांनी कोणते आश्वासन पूर्ण केले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Halwa Recipe : हिवाळा आलाय झटपट बनवा हिरवागार मटार हलवा, 'ही' रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Social Media last Post : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; मृत्यूआधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Korigad Fort: गुलाबी थंडीत लोणावळ्याजवळील 'कोरिगड' किल्ल्याला नक्की भेट द्या

BJP vs Congress: भाजप नेत्याचं वक्तव्य खुपलं, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; हातापायाला धरून पोलीस व्हॅनमध्ये भरले

Wedding Stress: लग्नाच्या दिवशी नवरी थकलेली दिसतेय? मग या चुका करणं आत्ताच थांबवा

SCROLL FOR NEXT