

भाजपच्या ऑपरेशन लोटसविरोधात शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा उद्रेक साऱ्या राज्यानं पाहिला. एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत शाहांसमोर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या. हे सारं दिल्लीत घडत असताना इकडे मात्र रत्नागिरीत शिंदेसेनेचे शिलेदार उदय सामंतांनी त्याच चव्हाणांचं जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केलं. एवढंच नव्हे तर शिंदेंच्या तक्रारी असतानाही सामंतांनी मात्र चव्हाण जगात भारी असल्याची जाहिर पावती दिली.
मुळात खासदार श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय असलेल्या कल्याणच्या माजी नगरसेवकालाच चव्हाणांनी भाजपात घेतलं आणि शिंदेसेनेत उद्रेक झाला. एवढं सर्व झाल्यानंतरही उदय सामंतांनी आपल्या बालेकिल्ल्यात चव्हाणांची तोंडभरून स्तुती केली. मात्र यामुळे ठाकरेगटाला आयतं कोलित मिळालं...सामंत हे शिंदेसेना फोडणार असल्याचा मोठा दावाच ठाकरे गटानं केलाय. त्याला सामंतांनी मात्र विनोदानं घेतलंय.
भाजपनं शिंदेसेनेविरोधात विधानसभेत लढलेल्या मविआतल्या अनेक उमेदवारांना पक्षात प्रवेश दिलाय. त्यामुळे शिंदेसेनेतील अनेक मंत्री आणि आमदार अस्वस्थ आहेत. भाजपात आलेल्या राजू शिंदेंनी तर संभाजीनगरमधून शिंदेसेना संपवण्याचा निर्धारच केलाय.
शिंदेंच्या मंत्र्यांची डोकेदुखी वाढली?
शंभूराज देसाई Vs सत्यजित पाटणकर ((भाजपात प्रवेश))
सातारा
भरत गोगावले Vs स्नेहल जगताप (राष्ट्रवादीत प्रवेश)
रायगड
दादा भुसे Vs अद्वय हिरे (भाजपात प्रवेश)
मालेगाव
संजय शिरसाट Vs राजू शिंदे (भाजपात प्रवेश)
संभाजीनगर
शाहांच्या भेटीनंतर शिंदेंनी आपण रडणारे नव्हे लढणारे आहोत असं सांगून भविष्यातल्या संघर्षांचेच संकेत दिल्याची चर्चा आहे.
भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेसेनेतील अनेक मंत्री आणि आमदार अस्वस्थ आहेत. साडे तीन वर्षांपूर्वी अशाच अस्वस्थेचा ठाकरेंविरोधात वापर करून शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना फोडण्यात आली. त्यामुळे शिंदेंचाच कित्ता गिरवून सामंतांच्या रुपानं तिसरी शिवसेना जन्माला येणार की शिंदे भाजपला यशस्वीरित्या तोंड देणार याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.