भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय

Stray dog news : भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची भरपाई मिळणार असल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. यामुळे कर्नाटकातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय
Published On
Summary

कर्नाटक सरकारकडून भटक्या कुत्रा हल्ल्यात मृत्यू झाल्यास ५ लाखांची नुकसानभरपाई जाहीर

गंभीर जखमींना ५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार

कर्नाटक सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा

देशात भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले सुरुच आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. जखमींनाही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय
कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिताला एकूण ५००० रुपये मिळणार आहेत. यातील ३५०० हजार रुपये थेट पीडित व्यक्तीला मिळणार आहेत . तर १५०० रुपये आरोग्य सुरक्षा ट्रस्टला दिले जाणार आहेत.

वरिष्ठ काँग्रेस नेते, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी तामिळनाडूमध्ये कुत्रा चावणे आणि रेबीजने मृत्यू होणाऱ्या घटनेवर चिंता व्यक्त केली होती. तामिळनाडूमध्ये भटके कुत्र्यांनी आतापर्यंत ५.२५ लाख लोकांवर हल्ले केले आहेत. तर यात २८ लोकांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ चिदंबरम यांनी दिला होता. श्वानप्रेमीचा अर्थ भटक्या कुत्र्यांना पकडणे आणि नसबंदी करणे आणि लसीकरणाला विरोध करणे असा नव्हे, असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय
Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

चिदंबरम यांनी पुढे म्हटलं होतं की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की, लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची पुन्हा सुटका करण्यात येणार आहे. लसीकरणाचा अर्थ कुत्र्यांना मारणे, असा होत नाही. खरंतर श्वानप्रेमींनी कोर्टाचा आदेश लागू करण्यासाठी मदत करायला हवी. कोर्टाचा हा निर्णय विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे'.

भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ५ लाखांची भरपाई, सरकारचा मोठा निर्णय
Mumbai Politics : मुंबईत निवडणुकीआधीच वादाचा बॉम्ब फुटला; ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले, नेमकं काय घडलं?

तत्पूर्वी, सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय, खेळाचे मैदान, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की, पकडलेल्या कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com