steel plant blast Saam tv
देश विदेश

आंध्र प्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट; ८ मजुरांचा मृत्यू

andhra pradesh steel plant blast : आंध्रप्रदेशातील स्टील प्रकल्पात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये घडली मोठी घटना

स्फोटात ८ मजुरांचा मृत्यू

कारखान्यातील स्फोटामुळे काही मजूर गंभीर जखमी

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधून मोठी बातमी हाती आहे. स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. प्रकलपाच्या SMS-2 आणि STC-3 उष्णता केंद्रात लागलेल्या आगीमुळे वितळलेल्या स्टीलची गळती झाली. उकळते लिक्विड स्टील अंगावर पडून ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

कारखान्यात उच्च तापमानात वितळलेल्या लिक्विट स्टील हे कर्मचाऱ्यांवर पडलं. गरम गरम लिक्विड स्टील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडल्यानंतर अनेकांची धावाधाव झाली. काही कर्मचारी मदतीसाठी घटनस्थळी पोहोचले. त्याचबरोबर त्यांनी कारखान्याला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, स्टील प्रकल्पात एसएमएस-२ आणि एसटीसी-३ हीट एफजी विभागात ही घटना घडली. क्रेनच्या साहाय्याने उकळते लिक्विड स्टील उचलले जात होते. १५०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात उकळत ठेवण्यात आलेल्या भांड्यातील लिक्विड अचानक अनियंत्रित झालं. त्यामुळे उकळते लिक्विड स्टील काम करणाऱ्यांवर मजुरांवर पडले.

कारखान्यात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कारखान्यात कामाला असेलेले अनेक मजूर जखमी झाले आहेत. काही जणांनी घटनेनंतर कारखान्याबाहेर धाव घेतली. तर काही जण मदतीला धावून गेले.

तत्पूर्वी, या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दुर्घटनेत जखमींना मदत करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT