Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025 Saam
देश विदेश

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Maithili Thakur May Contest Bihar Elections 2025: प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने घेतली भाजप नेते विनोद तावडेंची भेट. विधानसभा निवडणूक लढणार? तावडे यांची पोस्ट व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • बिहार विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलं.

  • प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर राजकीय रिंगणात उतरणार?

  • भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत.

बिहार विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाजलंय. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये निवडणुका २ टप्प्यांत होणार आहेत. ६ नोव्हेंबरला पहिला टप्पा. तर, ११ नोव्हेंबरला दुसरा टप्प्याचं मतदान पार पडणार आहेत. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. काल झालेल्या घोषणेनंतर राज्यातील सर्वच पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेला कारण ठरलं आहे, भाजप नेत्याची पोस्ट. तसेच मैथिली ठाकूरने भाजप नेत्यांशी घेतलेली भेट. यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान, मैथिली ठाकूर यांचे वडिलही उपस्थित होते. त्यांचा फोटो समोर आला आहे.

मैथिली ठाकूरने भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान, तिचे वडीलही तेथे उपस्थित होते. या भेटीनंतर विनोद तावडेंनी त्यांच्या अधिकृत समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली. '१९९५ साली लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार सोडून गेलेल्या एका कुटुंबातील मुलगी, गायिका मैथिली ठाकूर आता बिहारची बदलती गती पाहून, पुन्हा बिहारला परत येऊ इच्छित आहे. आम्ही तिच्याकडे बिहार राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. मैथिली ठाकूर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा'.

या पोस्टमुळे मैथिली ठाकूर बिहारची विधानसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चर्चेनंतर मैथिली ठाकूरने एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारसाठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांशी होणारा प्रत्येक संवाद मला सेवेच्या शक्तीची आठवण करून देतो. नित्यानंद रायजी आणि विनोद तावडेजी यांचे खूप आभार'. विनोद तावडे यांनी केलेली पोस्ट आणि मैथिली ठाकूर यांनी दिलेली प्रतिक्रिया, यामुळे गायिका लवकरच राजकीय रिंगणात उतरणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : प्रणित मोरेचा स्वॅग लय भारी, बनला 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन

Shocking: भाजप नेत्याची हत्या करणाऱ्यांचा एन्काऊंटर, आरोपीच्या वडिलांची आत्महत्या, तर आईनं विष प्यायलं...

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

Local Bodies Election: मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, महत्त्वाची माहिती समोर

Kuland Fort History: सह्याद्रीतील धोकादायक आणि रोमांचक ट्रेक; कुलंग किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT