Patil Kulkarni Farm  Saam TV
देश विदेश

Patil Kulkarni Farm : पाटलांचा नादच खुळा! पुण्याच्या जोडप्याने थेट अमेरिकेत फुलवली शेती; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, एकच नंबर!

Maharashtrian Farm in America : फॉरेनमध्ये सुद्धा काळ्या मातीत मातीत तिफन चालते...; पुण्याच्या जोडप्याने अमेरिकेत फुलवली शेती, पाहा VIDEO

Ruchika Jadhav

मराठी माणूस सध्या देशभर नाही तर जगभर आपल्या कामाचा डंका गाजवत आहे. भारतीय नागरिकांनी परदेशात केलेली कमाल कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. अशात सध्या पुण्यातील पाटील - कुलकर्णी हे अस्सल मराठमोळं जोडपं चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण या जोडप्याने थेट अमेरिकेमध्ये गावरान मळा फुलवला आहे. त्यांनी आपल्या शेतीचा आणि येथील कामाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलाय. चला तर गम त्यांच्या या शेतीविषयी आणखी माहिती जाणून घेऊ.

पाटील-कुलकर्णी फार्म असं त्यांच्या शेतीचं नाव आहे. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वत: दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमधील अटलांट येथे एक छोटं गाव आहे. या गावात त्यांनी आपल्या महाराष्ट्रासारखं पूर्ण सेटअप केलंय. त्यासाठी त्यांनी येथे शेती सुरू केली. फक्त भाजी-पाल्याची शेती नाही. तर त्यांनी येथे कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या यांसह गायी आणि घोडे सुद्धा पाळले आहेत.

अमेरिकेत राहूनही हे जोडपं आपल्या शेतात पिकवलेला भाजीपालाच खातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जोडप्याची शेती फक्त एवढ्यावरच मर्यादीत नाही. त्यांनी आपल्या फार्ममध्ये मधमाशांची सुद्धा शेती केली आहे. येथे ते अस्सल गावठी मध सुद्धा बनवतात.

पाटील-कुलकर्णी फार्म परदेशातील व्यक्तींसाठी पर्यटन म्हणून सुद्धा सुरू करण्यात आलं आहे. येथे आलेल्या व्यक्तींना महाराष्ट्रात पिकवला जाणारा भाजीपाला आणि खाद्य संस्कृतीची माहिती दिली जाते. येथे आलेल्या व्यक्तीला पोटभर जेवण आणि राहण्यासाठी जागा देखील दिली जाते. त्यामुळे अमेरिकेत राहून महाराष्ट्रातल्या काळ्या मातीचा फिल घ्यायचा असेल तर तुम्ही पाटील-कुलकर्णी फार्मला भेट देऊ शकता.

अमेरिकेत शेती फुलवण्यासाठी या जोडप्याने बरीच मेहनत घेतली आहे. हे जोडपे मूळचे पुण्याचे आहे. अमेरिकेत दोघेही आयटी इंजीनिअर म्हणून काम करतात. कामासोबत त्यांनी आपली संस्कृती आणि शेती थेट अमेरिकेपर्यंत पोहचवल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitendra Awhad: सनातन धर्मानं छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT