Reshim Farming : रेशीम शेतीतून सात वर्षांपासून उत्पादन; अल्पभूधारक शेतकऱ्याकडून यशस्वी प्रयोग

Washim News : पारंपरिक शेती करत सर्वच शेतकरी उत्पादन घेत असतात. याला काही अपवाद ठरतात आणि पारंपरिक शेती न करता त्यात नवीन प्रयोग करण्यावर भर देत चांगले उत्पादन घेत असतात
Reshim Farming
Reshim FarmingSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिमच्या भटउमरा गावातील अल्पभूधारक शेतकरी महादेव काळे हे मागील ७ वर्षांपासून (Washim) रेशीम शेतीतून यशस्वी उत्पादन घेत आहेत. अत्यल्प खर्च असलेल्या या शेती पूरक उद्योगातून त्यांना इतर पिकांच्या तुलनेत चांगलाच नफा मिळत आहे. (Latest Marathi News)

Reshim Farming
Kalyan News : इमारतीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग; नागरिकांची धावपळ

पारंपरिक शेती करत सर्वच शेतकरी उत्पादन घेत असतात. याला काही अपवाद ठरतात आणि पारंपरिक शेती न करता त्यात नवीन प्रयोग करण्यावर भर देत चांगले उत्पादन घेत असतात. मात्र अल्पभूधाक असलेले (Farmer) शेतकरी काही नवीन करण्याच्या मनःस्थितीत नसतात. मात्र वाशीमच्या भटउमरा येथील शेतकरी महादेव काळे हे अपवाद ठरले आहेत. काळे यांच्याकडे अवघी तीन एक्कर शेती आहे. यातून ते सात वर्षांपासून काळे हे रेशीम शेती करत चांगले उत्पादन घेत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Reshim Farming
Online Fraud : ऑनलाइन कपडे खरेदी करणे पडले महागात; बँक खात्यातून एक लाख लंपास

वर्षाला १ लाखाचे उत्पन्न 

सुमारे सात वर्षांपूर्वी काळे यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून १ एक्कर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांनी त्यातील काही क्षेत्र कमी केलं. काळे वर्षभरात रेशीम अळ्यांचे तीन बॅच घेतले. प्रत्येक बॅचला फक्त तीन ते साडेतीन हजार खर्च येतो. मात्र कोष निर्मिती झाल्यावर त्याची विक्री करून त्यांना एका बॅचकडुन त्यांना ३० ते ३५ हजार रुपये उत्पन्न मिळते. अवघ्या अर्धा ते पाऊण एकरात वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com