Maharashtra Rain: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान; बळीराजा संकटात

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainYandex

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे फळबागांसह लाखो हेक्टर शेतीचं (Maharashtra Rain Update) नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे.

लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी Maharashtra Rain) लावली. जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागातील आंबा, केळी , आणि द्राक्ष फळबागांसह इतर शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं (Rain Update) आहे.

हवामान खात्याने वर्तविला अंदाज खरा ठरला (Hailstorm) आहे. मागील दोन दिवसापासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. आज सकाळपासून भंडारा जिल्हात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. भाजीपाला, फळबागा आणि अन्य पिकांना बुरशी लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता (Unseasonal Rain) आहे.आंबा पिकाचे मोठे नुकसान भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अकाळी पावसाची झळ ६५०६ शेतकऱ्यांना बसलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील एकूण ३४११ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले (Maharashtra Weather Update)आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे या तीनही तालुक्यांतील ३४११ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. १२३ गावांमधील ६५०३ शेतकऱ्यांना'अवकाळी'ची झळ बसली आहे. मक्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्यांचे काम सुरू केले. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला (Maharashtra Weather) आहे. त्यात मक्याचे सर्वाधिक, तर ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, भाजीपाला, केळी, आंबा आणि लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

Maharashtra Rain
Unseasonal Rain : सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; ज्वारी- बाजरी यासह उन्हाळी पिके आडवी, वीज पडून गाईचा मृत्यू

यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत (Weather Update) आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. आज पहाटेच पावसाने यवतमाळमध्ये हजेरी लावली आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह थंडगार हवेची लाट पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील तीन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. अवकाळी पावसामुळे सोळा हजार घरांची पडझड झाली आहे. तर एकूण 56 हजार हेक्टर शेती क्षेत्र बाधित झालं आहे. गहू, ज्वारी, तीळ, केळी , कांदा भाजीपाला, लिंबू संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 13 गुरांचा मृत्यू झाला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी (Unseasonal Rain In Vidarbha) पहाटेपासून नागपूरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो एलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये आज पहाटेॉपासून विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असतांना त्या तुलनेत आज मात्र पावसाचा जोर वाढल्याचं दिसून आलं आहे.

Maharashtra Rain
Maharashtra Unseasonal Rain: अकोला, जळगाव नांदेडसह वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं, घरांसह शेतपिकांचे मोठं नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com