Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Police Contain Situation In Pune: पुण्यातील मुकुंदनगर येथील अतिक्रमण झालेल्या दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

पुणे येथील मुकुंदनगर भागात असलेल्या अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहेत. या संघटनांनी लक्ष्मी नारायण चौकात आज तीव्र आंदोलन केले. आणि हा दर्गा हटवण्यासाठी अल्टीमेटम देखील दिला.

पुण्यातील मुकुंदनगर येथील असलेल्या हजरत दम दम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावाने झालेले फुटपाथावरील अतिक्रमण काढण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने अनेक दिवसांपासून होत आहे. या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान दुसरीकडे या दर्ग्याच्या समर्थनात दलित संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत येथील परिस्थिति नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com