chitrarath Saam Tv
देश विदेश

Maharashtra Tableau: यूपी-बिहारला परवानगी; पण प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला संधी नाही? कारण काय?

Republic day 2025: गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथांचे सादरीकरण केले होते. पण या वर्षी राज्याला संचालनामध्ये संधी मिळाली नसल्याचे म्हटले जात आहे.

Saam Tv

Maharashtra Tableau: २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भव्यदिव्य चित्ररथांच्या कार्यक्रमांचा देखील सहभाग असतो. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ नेहमीच लक्षवेधी असतो. गेल्या वर्षी राज्य सरकारने ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ तयार केला होता. पण २०२५ मध्ये महाराष्ट्राचा चित्ररथाला कर्तव्यपथावरील संचलनासाठी परवानगी मिळाली नसल्याचे म्हटले जात आहे.

गतवर्षी शिवराज्याभिषेकाचा ३५० वर्षांचा चित्ररथ तयार करण्यात आला होता. त्याआधी मराठी रंगभूमीच्या १७५ व्या सुवर्णमयी इतिहासावर चित्ररथ सादर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे मांडण्यात आला. ऐनवेळी या प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्ती यावर आधारलेल्या चित्ररथाचे संचालन करण्यात आले होते.

प्रजासत्ताक दिनी होणारा चित्ररथाचा कार्यक्रम हा प्रत्येक राज्यासाठी, केंद्रशासित प्रदेशासाठी महत्त्वपूर्ण असतो. त्यावर राज्यांची प्रतिष्ठा पणाला असते. यावरुन राजकीय वाद देखील होतात. हे वाद आणि सततच्या येणाऱ्या तक्रारी पाहता प्रत्येक राज्याचा चित्ररथ किमान एकदा सादर व्हावा असा नियम संरक्षणाद्वारे करण्यात आला आहे. शिवाय चित्ररथाचा विषयाची परवानगी देखील संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीकडून मिळायला हवी अशी अटही ठेवण्यात आली आहे.

नव्या नियमांमुळे २०२५ च्या चित्ररथ संचालनाच्या यादीमध्ये महाराष्ट्राला सध्यातरी स्थान मिळाले नाही असे म्हटले जात आहे. या यादीत गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड ही राज्ये आहेत. तर चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश संचालनामध्ये सहभागी होणार आहेत. मिझोराम, सिक्कीम या राज्यांनी कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिला. तर अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपचे प्रतिनिधी समितीच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांची संधी हुकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT