PM Modi meeting with Shinde Sena MPs inside story Saam Tv
देश विदेश

Breaking: 'काळजी करू नका मी तुमच्यासोबत', शिवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांना PM मोदींचा शब्द; बैठकीची Inside Story

PM Modi meeting with Shinde Sena MPs inside story: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांची भेट घेत त्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असा शब्द दिला.

Priya More
  • पंतप्रधान मोदींची शिंदेसेनेच्या बंडखोर खासदारांसोबत बैठक

  • पीएम मोदींनी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांना दिला शब्द

  • काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे असे आश्वासन दिले

  • शिंदेसेनेच्या खासदारांना मोदींचा पाठिंबा

  • बैठकीची इनसाइड स्टोरी आली समोर

दिल्लीतून मोठी घडामोड समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या ६ बंडखोर खासदारांशी संवाद साधला. या सर्व खासदारांची भेट घेत पीएम मोदी यांनी त्यांना 'काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे', असा शब्द दिला. या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या बैठकीमध्ये राजकीय घडामोडींसोबत या सर्व खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा झाली. यावेळी पीएम मोदी यांनी या सर्वांना विकास कामांवर भर देण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान पीएम मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांची भेट घेत स्वतंत्र संवाद साधला. या ब्रेकफास्ट बैठकीतील इनसाइड स्टोरी सममोर आली आहे. 'मतदारसंघातील काम मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा. कुठलीही विकासकामे असतील तरी थेट कार्यालयाशी संवाद साधा', असे आवाहन पीएम मोदी यांनी त्यांना दिले.

यावेळी त्यांनी प्रत्येक खासदाराची स्वतंत्र विचारपूस केली. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सर्व खासदारांना'मी तुमच्या सोबत आहे काळजी करू नका.', असे आश्वासन दिले. तसंच, त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल मोदींनी माहिती जाणून घेतली

उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदारांना पीएम मोदींनी काळजी करू नका मी तुमच्यासोबतत आहे असे आश्वासन दिले. पीएम यांनी या सर्व खासदारांना असे देखील सांगितले की, '⁠एनडीए एक परिवार आहे. ⁠भाजप घटक पक्षांसोबत आहे. ⁠प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला जाईल आणि प्रत्येकाला संधी दिली जाईल. ⁠आम्ही एनडीएतील घटकपक्ष म्हणूनच नव्हे तर प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आहोत. ⁠एनडीएतील प्रत्येक खासदारासोबत मी आहे.'

प्रत्येक खासदाराशी त्यांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांची विचारपूस केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या योगाभ्यासाबाबतही त्यांनी विशेष चौकशी केली. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देताना पंतप्रधान म्हणाले, 'शरीर निरोगी असेल तरच देशाची प्रभावी सेवा करता येईल. गरीब, शेतकरी आणि मजुरांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि नेहमी अद्ययावत राहा.' असे पीएम मोदींनी सांगितले.

पूर्वोत्तर भारताच्या विकासावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी या राज्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नव्हते. आता पूर्वोत्तरसह संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास करणे हे सरकारचे ध्येय आहे. एनडीएमध्ये कोणत्याही पक्षाचे महत्त्व केवळ खासदारांच्या संख्येवर ठरत नाही. एकच खासदार असलेल्या पक्षालाही मोठ्या पक्षांइतकाच सन्मान दिला जातो, असे स्पष्ट करत त्यांनी एनडीए अधिक मजबूत करून देशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी खासदारांना संसदेतील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे, संसदीय इतिहासाचा अभ्यास करण्याचे आणि संसदेत उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक संदर्भ साहित्याचा अभ्यास करून तयारीने चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

SCROLL FOR NEXT