PM Modi: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या, पण...' पंतप्रधान मोदींनी GEN-Z ना केलं मोठं आवाहन

PM Narendra Modi On Delhi Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान पीएम मोदींविरोधात आंदोलक तरुणांनी आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
PM Modi: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या, पण...' पंतप्रधान मोदींनी GEN-Z ना केलं मोठं आवाहन
PM Narendra ModiSaam Tv
Published On
  • पंतप्रधान मोदींचे GEN-Z तरुणांना आवाहन

  • मोदींनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना माफ केलं

  • जंतर मंतर आंदोलनावर मोदींनी प्रतिक्रिया दिली

  • देशातील तरुणांना पीएम मोदींनी भावनिक आवाहन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत देशातील GEN-Z तरुणांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान मला आणि माझ्या आईला शिव्या देणाऱ्या मुलांना मी माफ करतो, असं म्हटलंय. तसंच सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करण्याचं भावनिक आवाहन त्यांनी देशातील तरुणांना केले. पीएम मोदी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शु्क्रवारी इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्टद्वारे पुन्हा एकदा देशातील तरुणांना संबोधित केले. या व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'जंतर मंतरवर जे घडले ते देश आणि जगाने पाहिले. काही उपद्रवी मुलांनी अशी अश्लील आणि असभ्य भाषा वापरली जी एका सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही. मला शिवीगाळ केली गेली आणि माझ्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आली.'

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'पण मला जर या वस्तुस्थितीबद्दल बोलायचे आहे की, लहानपणी चुका होतात आणि त्यात सुधारणा करण्याची संधीही असते. समाजातील संताप मी पूर्णपणे समजू शकतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी बोलू शकतात याचा मला धक्का बसला. पण हीच वेळ आहे की, आपण या मुलांना आपलेसे करून त्यांना योग्य मार्ग दाखवावा. ही मुलं भरकटलेली आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले काम आहे.'

तसंच, 'या मुलांना शिक्षा केल्याने, न्यायालयात फेऱ्या मारायला लावल्याने आणि समाजात त्यांचा छळ केल्याने परिस्थितीत काहीही बदल होणार नाही. त्यामुळे मला त्यांना माफ करायचे आहे. समाजानेही माझं हे बोलणं स्वीकारले पाहिजे. कारण माझ्या मनात एकच भावना आहे. कधीकधी आपली जीभ दातांमध्ये येते आणि रक्त येते पण आपण दात तोडत नाहीत. कारण दात आपले आहेत जीभ आपली आहे आणि मुलेही आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले काम आहे.', असे पीएम मोदी म्हणाले.

त्यांनी पुढे देशातील तरुणांना योग्य मार्ग दाखवायचे सांगत त्यांना आवाहन केले की, 'मार्ग भरकटलेल्यांना मार्ग दाखवणे अवघड आहे पण हे कठीण काम आपल्याला करायला पाहिजे. म्हणूनच, मी या मुलांना सांगतो, चला, आपण देशासाठी एकत्र पुढे जाऊया. काहीतरी नवीन शिकुया, चुकांमधून शिकुया आणि आपली स्वप्ने घेऊन पुढे जाऊया. देश वेगाने प्रगती करत आहे आणि पुढेही करणार आहे आणि माझे स्वप्न आहे की तुम्हीसुद्धा नक्कीच प्रगती कराल. मी तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतो. त्यामुळे चला आपण सर्वजण एकत्र मिळून आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊया.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com