Shreya Maskar
हिवाळ्यात बाजारात ताजी, भरदार वांगी सहज मिळतात. अशा वांग्यांपासून बनवलेले गरमागरम वांग्याचे भरीत म्हणजे जेवणाची रंगत वाढवणारा खास पदार्थ. कोकण स्पेशल रेसिपी लिहून घ्या.
कोकण स्पेशल वांग्याचे भरीत बनवण्यासाठी मोठे भरताचे वांगे, कांदा,हिरव्या मिरच्या, लसूण, किसलेले खोबरे, कोथिंबीर, तेल, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
कोकण स्पेशल वांग्याचे भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम वांग्याला थोडे तेल लावून गॅसवर किंवा चुलीवर सर्व बाजूंनी छान भाजून घ्या. वांगे थंड झाल्यावर त्याची साल काढून आतील गर व्यवस्थित मॅश करून घ्या.
हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून किंवा ठेचून घ्या. एका भांड्यात मॅश केलेले वांगे, चिरलेला कांदा, मिरची-लसूण, खोबरे आणि कोथिंबीर एकत्र करा.
त्यात चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण छान एकजीव करा. वरून थोडे कच्चे तेल घालून पुन्हा मिक्स करा.
गरमागरम कोकण स्पेशल वांग्याचे भरीत ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी, पिठलं आणि ठेच्यासोबत सर्व्ह करा. चुलीवर भाजलेल्या वांग्याचा धुरकट स्वाद या पदार्थाला खास चव देतो.
भरीतासाठी बिया कमी असलेले, गरदार आणि ताजे वांगे निवडा. त्यामुळे भरीत मऊ आणि चविष्ट होते. वांग्याला थोडे तेल लावून सर्व बाजूंनी छान भाजून घ्या. यामुळे भरीताला खास धुरकट स्वाद येतो.
लसूण आणि मिरची भाजून ठेचल्यास भरीताला झणझणीत आणि खमंग चव मिळते. बारीक किसलेले ओले खोबरे, कांदा आणि कोथिंबीर घातल्याने भरीताला खास कोकणी टच मिळतो.