Shreya Maskar
हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देणारा आणि खाण्यासाठी चविष्ट असा पदार्थ म्हणजे खजूर आणि सुका मेवा लाडू! विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी साखरेची गरजही लागत नाही.
खजूर-सुका मेव्याचे लाडू बनवण्यासाठी खजूर, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, किसलेले सुके खोबरे, खसखस, तूप आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
खजूर-सुका मेव्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत थोडे तूप गरम करून त्यात बदाम, काजू, अक्रोड आणि पिस्ता मंद आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करा.
आता त्याच कढईत थोडे तूप घालून त्यात बिया काढलेले खजूर टाका. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे परतून खजूर मऊ करून घ्या.
मऊ झालेल्या खजुरामध्ये भाजलेला सुका मेवा, खोबरे, खसखस आणि वेलची पूड घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला तूप लावून त्याचे छोटे-छोटे लाडू वळून घ्या. वरून थोडा पिस्ता किंवा खोबरे लावून सजवा.
लाडू पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवल्यास ते काही दिवस टिकू शकतात.
सुक्या मेव्यामुळे आहारात प्रथिने, फायबर आणि खनिजांचा समावेश होतो. बदाम आणि अक्रोडातून चांगले फॅट्स मिळतात. खजूरातून नैसर्गिक साखर आणि ऊर्जा मिळते.