Gajar Halwa Recipe : हिवाळ्यात गाजरांपासून बनवा चमचमीत हलवा; चव इतकी अप्रतिम की पुन्हा पुन्हा खाल!

Shreya Maskar

हिवाळा

हिवाळा सुरू झाला की बाजारात लालचुटूक आणि ताजी गाजरं मोठ्या प्रमाणात मिळू लागतात. या गाजरांपासून बनवलेला गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजाच काही और असते. चला तर मग, जाणून घेऊया घरच्या घरी स्वादिष्ट गाजराचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.

winter | pinterest

गाजराचा हलवा

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल गाजरे, दूध, साखर, तूप, खवा, वेलची पूड, काजू, बदाम आणि मनुका इत्यादी साहित्य लागते.

Gajar Halwa | pinterest

गाजर

सर्वप्रथम गाजरे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढा. त्यानंतर किसणीच्या मदतीने गाजरांचा बारीक कीस करून घ्या.

carrot | pinterest

तूप

एका जाड बुडाच्या कढईत थोडे तूप गरम करा. त्यात गाजराचा कीस घालून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. यामुळे हलव्याला छान सुगंध येतो.

ghee | pinterest

दूध

आता कढईत दूध घाला आणि गाजरांचा कीस चांगला हलवून घ्या. मध्यम आचेवर दूध आटेपर्यंत मिश्रण शिजू द्या. अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण कढईला लागणार नाही.

milk | pinterest

साखर- खवा

दूध आटल्यानंतर त्यात साखर घाला. साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होईल. पुन्हा हलवत राहून त्यातील अतिरिक्त ओलावा आटवून घ्या. त्यानंतर थोडा खवा टाका.

Eat sugar | pinterest

ड्रायफ्रूट्स

आता उरलेले तूप, चिरलेले काजू-बदाम आणि मनुका घालून हलवा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या बाजू सोडू लागले की त्यात वेलची पूड मिसळा.

Dry fruits | pinterest

काजू-बदाम

तयार झालेला गाजराचा हलवा एका बाऊलमध्ये काढा. वरून थोडे काजू-बदाम घालून सजवा. गरमागरम किंवा थंड करूनही हा हलवा खायला अतिशय स्वादिष्ट लागतो.

Cashews and almonds | pinterest

NEXT : हिवाळ्यात नाश्त्याला बनवा गरमागरम मेथीचे थालीपीठ, चव इतकी भारी की पुन्हा पुन्हा खाल

Methi Thalipeeth Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...