Mahadev App Case Saam Digital
देश विदेश

Mahadev App Case : महादेव ॲपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; 580 कोटींची मालमत्ता गोठवली

Mahadev App Case Update : शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)कोलकातास्थित हवाला ऑपरेटरची 580 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे.

Sandeep Gawade

Mahadev App Case

महादेव अॅप घोटाळा व्यवहार करण्यासाठी देशभरात तब्बल 1600 नवीन बँक खाती तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली होती. यानंतर या बँक खात्यातून ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तब्बल 5000 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कंपनीचा संचालक आणि या प्रकरणात मुख्य आरोपी मृगांक मिश्रा याला अलीकडेच मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)कोलकातास्थित हवाला ऑपरेटरची 580 कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे.

छाप्यादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत. ईडीने मुंबई, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील 17 ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच ईडीनेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुधवारी केलेल्या कारवाईत कोलकाता-आधारित कंपनीकडून 1.8 कोटी रुपयांची रोकड आणि कंपनीने 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेची लाँडरिंग केली होती.हे प्रकरण ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे ज्यात कथितपणे लोकांची फसवणूक करून सुमारे 5000 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. ईडीने गेल्या वर्षी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आतापर्यंत छत्तीसगडच्या एका पोलिसासह नऊ जणांना अटक केली आहे.

बनावट बँक खात्यातून व्यवहार

महादेव ॲपसाठी देशातून मिळणारा पैसा गोळा करण्यासाठी बँक खाती उघडण्यात आली होती. मात्र, सदर बँक खाती बनावट कागदपत्रे किंवा इतर पद्धतीने उघडण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. अनेक गरीब नागरिकांच्या सरकारी कागदपत्रांचा वापर करत त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नावे ही खाती उघडण्यात आल्याची तपासात उघड झालं आहे.

परंतु खाती गरीबांच्या नावावर असली तरी बँक खात्याचे व्यवहार मात्र ॲपचा मालक मृगांक मिश्रा सर्व व्यवहार हाताळत होता.या खात्याच्या माध्यमातून जमा झालेले पैसे रोखीने काढून त्याचा हवाला मार्फत हस्तांतरण करण्यात आल्याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांना भारतातून पैसे हस्तांतरित करण्यात मिश्रा याची भूमिका महत्त्वाची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT