Accident News Saamtv
देश विदेश

MP Car Accident News: पार्टी करुन घरी परतताना मृत्यूने गाठले... भरधाव कार झाडावर आदळली; ५ जणांचा मृत्यू

Accident News: मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील घुंघुटी चौकीखाली रविवारी रात्री (२४, सप्टेंबर) ला हा भीषण अपघात झाला.

Gangappa Pujari

Car collides with tree in Umaria:

मध्यप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोलच्या सीमेला लागून असलेल्या उमरिया जिल्ह्यातील पाली रोडवर रविवारी भरधाव कार झाडावर आदळली, या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरधाव कार झाडावर धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील घुंघुटी चौकीखाली रविवारी रात्री (२४, सप्टेंबर) ला हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेले पाच जण शहडोल येथील रहिवासी आहेत.

एसडीओपी पाली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाची पार्टी करुन सर्वजण मदारी ढाब्यावरून शहडोलकडे परतत होते. यावेळी उमरिया जिल्ह्यातील पाली पोलिस स्टेशन अंतर्गत घुंघुटी चौकीच्या माझगवान गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा जिल्हा रुग्णालयात पोहोचताना मृत्यू झाला.

मृतांमध्ये शहडोल जिल्ह्यातील खनिज विभागात कार्यरत असलेले पुष्पेंद्र त्रिपाठी, जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात अवनीश दुबे यांच्यासह ५ जणांचा समावेश आहे. ही घटना इतकी भीषण होती की, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT