Nitesh Rane Letter : संजय राऊत-अंबादास दानवेंच्या अडचणी वाढणार? भाजप आमदार नितेश राणेंचं विधानसभा सचिवांना पत्र

Political News : विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे दोघांवर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Nitesh Rane - sanjay raut- Ambadas Danve
Nitesh Rane - sanjay raut- Ambadas DanveSaam TV
Published On

सूरज मसूरकर

Mumbai News :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे दोघांवर विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि अंबादास विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकण्यासाठी सातत्याने वक्तव्ये करत आहेत. त्यांची विधाने राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असं नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Nitesh Rane - sanjay raut- Ambadas Danve
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेवर आज महत्वपूर्ण सुनावणी, नेमकं काय होणार?

नितेश राणे यांनी पत्रात काय म्हटलं?

नितेश राणे यांना पत्रात म्हटलं की, संजय राऊत यांनी नजीकच्या काळात विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली.

१. "संविधान, कायदा व विधीमंडळाशी बेईमानी करुन वेळकाढूपणा चाललाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारला चालवत आहेत काय?"

२. "आम्ही करु ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतील तर ती बादशाही बुडाल्याशिवाय राहणार नाही."

३. "विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत."

अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात पुढील प्रमाणे वक्तव्य केले. "उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करत आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये उपरोक्त दोन्ही व्यक्तींचे राजकीय हितसंबध आहेत. या पार्श्वभूमीवर नमुद वक्तव्ये करुन त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची कृती केली असून त्याद्वारे विधानसभा अध्यक्षांचा पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.

Nitesh Rane - sanjay raut- Ambadas Danve
Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा; त्या व्हिडीओमुळे सत्ताधारी-विरोधकांमुळे जुंपली

अशा प्रकारचे स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो. संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती नितेश राणे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com