Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा; त्या व्हिडीओमुळे सत्ताधारी-विरोधकांमुळे जुंपली

Devendra Fadnavis Viral Video: देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
Devendra Fadnavis Nagpur Viral Video
Devendra Fadnavis Nagpur Viral VideoSaam TV
Published On

Devendra Fadnavis Nagpur Viral Video

राज्यातील उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात शनिवारी पावसाने थैमान घातलं. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. याशिवाय सीताबर्डी आणि आसपासच्या परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान झालं. दरम्यान, झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात गेले. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Nagpur Viral Video
Kirit Somaiya Threat: ५० लाख दे, नाहीतर 'तो' व्हिडीओ व्हायरल करेल; किरीट सोमय्या यांना अज्ञाताकडून धमकी

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पाहणी करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसने हा व्हिडीओ ट्वीट करत फडणवीस यांनी स्थानिकांना अरेरावी केल्याचा आरोप केला. "सत्तेचा माज... मदत मागणार्‍या पूरामुळे त्रस्त नागरिकाला फडणवीसांनी दिला धक्का", असं ट्वीट शिवसेनेनं आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन केलं.

तर काँग्रेसने (Congress) देखील ट्वीट करत भाजपला धारेवर धरलं. "पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत ? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार?", अशी जहरी टीका केली.

दरम्यान, या व्हिडीओवरून एकीकडे विरोधकांकडून फडणवीसांवर अरेरावी केल्याची टीका केली जात असताना आता भाजपानं या प्रसंगाचा दुसरा व्हिडीओ ट्वीट करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. "अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे", असं प्रत्युत्तर भाजपने दिलं.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा", असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं.

(गर्दीतून त्याला जवळ ओढल्याचा स्पष्ट व्हीडिओ आणि त्याच्या घरी प्रत्यक्ष भेट दिल्याचा व्हीडिओ सोबत जोडला आहे) पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो, असा टोलाही भाजपकडून विरोधकांना लगावण्यात आला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com