Youth Injured After Trying Dangerous Firecracker Stunt for Social Media Saam
देश विदेश

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

Youth Injured After Trying Dangerous Firecracker Stunt for Social Media: मध्यप्रदेशातील झाबुआमधील तरुणाने तोंडात सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसला आणि जबडा गंभीररित्या भाजला.

Bhagyashree Kamble

  • तरूणानं तोंडात ७ सुतळी बॉम्ब पेटवली.

  • आठवा सुतळी बॉम्ब पेटवताना चूक झाली.

  • तोंडात बॉम्ब फुटला.

  • तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू.

मध्यप्रदेशातील झाबुआमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणानं जाणूनबुजून तोंडात सुतळी बॉम्ब फोडला. स्फोटामुळे त्याचा चेहरा गंभीरपणे भाजला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्या तरूणाला नवीन ट्रेंड सुरू करायचा होता. तो तोंडात छोटे फटाके फोडत होता. मात्र, त्यानं सुतळी बॉम्ब फोडला. यामुळे त्याचा चेहर गंभीररित्या भाजला गेला. त्याला पुढील उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बुधवारी झाबुआ जिल्ह्यातील बाछिखेडा गावातून ही घटना उघडकीस आली. रोहित (वय वर्ष १८) तरूण तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून फोडत होता. एकामागून एक त्याने सात बॉम्ब तोंडात फोडले. त्याने याचे व्हिडिओही शूट केले. मात्र, आठवा बॉम्ब फोडताना त्याच्याकडून चूक झाली. सुतळी बॉम्ब त्याच्या तोंडातच फुटला. या स्फोटात तरूणाचा चेहरा फाटला.

अपघातानंतर रोहितला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. रूग्णालयाचे डॉक्टर एम.एल चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाच्या जबड्याला दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर खोलवर जखम झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला दुसऱ्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

सारंगी पोलीस स्टेशनचे प्रभारी दीपक देवरे यांनी या घटनेला तरूणाचा निष्काळजीपणा असल्याचं सांगितलं. दरम्यान, सोशल मीडियावर दाखवण्यासाठी तरूणांनी धोकादायक पाऊल उचलू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पूर्वेत चिंचपाडा १०० फूट रोडवर उभ्या कारला आग

Nanoship Relationships: जेन झीमध्ये फेमस असलेली नॅनोशिप रिलेशनशिप नक्की काय आहे?

Osteoporotic spine fracture: ऑस्टियोपोरोटिक स्पाइन फ्रॅक्चरचं निदान कसं केलं जातं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणती काळजी घ्याल

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

SCROLL FOR NEXT