मोठी बातमी! दिवाळीनिमित्त घरात दिवा लावला अन् अनर्थ घडला; काँग्रेसच्या नेत्याचा आगीत होरपळून मृत्यू

Showroom Owner Pravesh Agrawal Dies of Suffocation: इंदूरमध्ये तीन मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीत शोरूम मालकाचा मृत्यू झाला.
Showroom Owner Pravesh Agrawal Dies of Suffocation
Showroom Owner Pravesh Agrawal Dies of SuffocationSaam
Published On
Summary
  • इंदूरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग लागली.

  • आगीत शोरूम मालकाचा मृत्यू झाला.

  • पत्नी आणि लहान मुलगी गंभीर जखमी.

मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरात आग लागल्यामुळे शोरूम मालक प्रवेश अग्रवाल यांचा मृत्यू झाला. इंदूरमधील तीन मजली इमारतीला आग लागली होती. या आगीत अग्रवाल यांचा गुदमरून मृत्यू झाला. आग लागली तेव्हा कुटुंब घरात झोपले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

ही घटना गुरूवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास लासुडिया पोलीस स्टेशन परिसरात घडली. पोलीस निरीक्षक नीतू सिंग यांनी सांगितले की, 'इमारतीच्या तळ मजल्यावर कार कंपनी मालकाचं शोरूम आहे. तर, तिसऱ्या मजल्यावर प्रवेश अग्रवाल यांचे शोरूम आहे. अग्रवाल यांचं तिथेच पेंटहाऊस आहे. घरातील मंदिरात दिवा तेवत होता. या दिव्यामुळे घरात आग लागली. हळूहळू संपूर्ण घरात धूर पसरला'.

Showroom Owner Pravesh Agrawal Dies of Suffocation
सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

'आग लागली तेव्हा घरात पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली होत्या. या घटनेत शो रूम मालकाचा दुर्देवी मृत्यू झाला', असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रूग्णालयात पाठवलं. तर, व्यावसायिकाच्या लेकीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Showroom Owner Pravesh Agrawal Dies of Suffocation
बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

आग लागली असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घरात प्रचंड धूर झाल्यामुळे प्रवेश अग्रवाल यांचा गुदमरून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com