बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Furious Bull Leaves One Dead Many Injured: कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाने घेतला एकाचा बळी, अनेक जण जखमी; परिसरात दहशत. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.

कर्जत शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीराम पुलाजवळ एका पिसाळलेल्या बैलाने हल्ला करून एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीस गंभीर जखमी केलं आहे. याशिवाय बैलाच्या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी सांगितले की, पिसाळलेल्या बैलामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक प्रशासनाकडे या बैलाला ताब्यात घेण्याची मागणी करत आहेत. प्रशासनाकडूनही घटनास्थळी तातडीने लक्ष देण्यात आले असून, बैलावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजन सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com